राज्यात उद्यापासून ‘या’ 18 जिल्ह्यांत संपूर्ण अनलॉक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात उद्यापासून ‘या’ 18 जिल्ह्यांत संपूर्ण अनलॉक

राज्यात  करोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट होत आहे. तसेच रिकव्हरी रेटही वाढत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने आता राज्यात अनलाॅकची प्रक्रिया सुरू केली आहे.

साताऱ्यात उदयनराजे भोसले आघाडीवर
कृषीतील आव्हाने पेलण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत आवश्यक ः कृषीमंत्री तोमर
उत्तरप्रदेशात दुसर्‍या कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा

मुंबई – राज्यात  करोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट होत आहे. तसेच रिकव्हरी रेटही वाढत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने आता राज्यात अनलाॅकची प्रक्रिया सुरू केली आहे. अनलाॅकबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठी घोषणा केलीय. राज्यात 5 टप्प्यांमध्ये अनलाॅक होणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

राज्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षेबाबतचा निर्णय घेण्यासाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात इयत्ता १२ वीची परीक्षा रद्द करण्यासोबतच राज्यात आता एकूण पाच स्तरांवर अनलॉक करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील अनलॉकची विभागणी पाच स्तरांवर करण्यात आली आहे. यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि एकूण ऑक्सिजन बेड्स २५ टक्के व्यापलेले असतील अशा ठिकाणी पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार आहे. यात सर्व दुकानं, गार्डन, सलून, थिएटर्स, मनोरंजनाची ठिकाणं सुरू ठेवता येणार आहेत. या पहिल्या स्तरामध्ये एकूण १८ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

या १८ जिल्ह्याचा समावेश 

ळे, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ 

अनलॉकचे पाच टप्पे पुढीलप्रमाणे:

पहिला टप्पा – सर्व निर्बंध उठवणार

दुसरा टप्पा – मर्यादित स्वरूपात निर्बंध उठवणार

तिसरा टप्पा – काही निर्बंधांसह अनलॉक

चौथा टप्पा – निर्बंध कायम

पाचवा टप्पा – रेड झोन. कडक लॉकडाऊन

COMMENTS