राज्यात आजपासून पाच दिवस मुसळधार पावसाचे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात आजपासून पाच दिवस मुसळधार पावसाचे

पुणे : मान्सूनचा परतीचा पाऊस परत गेला असला तरी राज्यात आगामी पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आठ जिल्ह्यांना येलो अल

पुणे रिंगरोडप्रकरणात जनतेच्या पैश्यांची लूट
ओबीसी संघटना आजपासून मैदानात
नेकनुर मध्ये राष्ट्रवादी ला खिंडार

पुणे : मान्सूनचा परतीचा पाऊस परत गेला असला तरी राज्यात आगामी पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. दक्षिण भारतातील बहुतांशी राज्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागातही पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. अनेक ठिकाणी ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर या आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. पुढचे 5 दिवस दक्षिण कोकण,दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह व कोल्हापूर सातारा जोरदार पावसाची शक्यता असून मुंबई ठाणे परिसरात हलका पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. पुढील काही तासांत जिल्ह्यांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान वेगवान वारे वाहणार असून हवेचा वेग 40 किमी प्रतितास असेल. रायगड, पुणे, अहमदनगर आणि नांदेड या चार जिल्ह्यांत देखील ढगाळ हवामान आहे. पुढील काही तासात या जिल्ह्यातपावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उद्यापासून पुढील चार राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे.

COMMENTS