Homeताज्या बातम्या

राज्यातील यशाचा किनवटमध्ये जल्लोष; पण स्थानिक पराभवाच्या जखमेवरची ’चर्चा’ अधिक गरम!

किनवट। प्रतिनीधी राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन करत ’नंबर वन’चा मान पटकावला. या विजयाचे

वाल्मिक कराडच्या संपत्तीवर येणार टाच !
Beed : महावितरणचा गलथान कारभार तार तुटून दोन एकर ऊस जळुन खाक ! (Video)
गोविंद तांडा येथील  शेतकर्‍यांची आत्महत्या

किनवट। प्रतिनीधी
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन करत ’नंबर वन’चा मान पटकावला. या विजयाचे पडसाद किनवटमध्येही उमटले असून, स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि लाडू वाटप करून जल्लोष साजरा केला. मात्र, या आनंदोत्सवाच्या दरम्यान शहरात एका वेगळ्याच चर्चेने जोर धरला आहे.
आ. भीमराव केराम आणि जिल्हाध्यक्ष ड. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर मंडळाचे अध्यक्ष स्वागत आयनेनीवार यांच्या नेतृत्वाखाली शहरांतील जिजामाता चौकात हा उत्सव साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा जयघोष करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. राज्यातील जनतेने विकास आणि सुशासनाला कौल दिला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार, गटनेते श्रीनिवास नेम्मानीवार, बाळकृष्ण कदम, सुनील मच्छेवार, विश्वास कोल्हारीकर, सतीश बिराजदार, नगरसेवक संतोष मरस्कोल्हे, जयराज वर्मा आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा विजय म्हणजे जनतेच्या विश्वासाची पावती आहे, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
विजयाचा जल्लोष की पराभवाचे शल्य?
राज्यातील विजयाचा उत्साह एकीकडे असताना, दुसरीकडे किनवटमधील राजकीय वर्तुळात मात्र उपरोधिक चर्चा सुरू आहे. किनवट नगर परिषद निवडणुकीत भाजपच्याच काही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध प्रचार केल्याचा आरोप होत आहे.  यामुळे भाजपला स्थानिक पातळीवर सत्तेपासून वंचित राहावे लागले. आता स्वतःच्या शहरात पक्षाला हरवून, राज्यातील यशाचा जल्लोष साजरा करून नेमके काय साध्य होणार? असा प्रश्न सामान्य नागरिक आणि राजकीय विश्लेषक विचारत आहेत.
अंतर्विरोध चव्हाट्यावर
स्थानिक पातळीवर पक्षाला खिंडार पाडणारे कार्यकर्ते आता राज्याच्या यशाचे श्रेय घेत फिरत असल्यामुळे, निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे. राज्यात यश मिळाले हे खरे, पण स्थानिक पातळीवर पक्ष सत्तेपासून दूर का राहिला? याचे आत्मचिंतन करण्याऐवजी जल्लोष करण्यावर अधिक भर दिला जात असल्याची टीका होत आहे.

COMMENTS