राज्यातील कारागृहे तुडुंब  ; दहा हजार कैद्यांना सोडल्यानंतरही 11 हजार कैदी जास्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील कारागृहे तुडुंब ; दहा हजार कैद्यांना सोडल्यानंतरही 11 हजार कैदी जास्त

कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर राज्याच्या विविध कारागृहांतील दहा हजार कैद्यांना तात्पुरता जामीन, पॅरोलवर सोडण्यात आले.

अकरा गावेही विकासाच्या रडारवर – आ. आशुतोष काळे 
संत ज्ञानेश्‍वर स्कूलमध्ये स्वातंत्र दिन उत्साहात
 बुलढाण्यात बाजार समित्यांसाठी मतदानाला सुरुवात

मुंबई /प्रतिनिधीः कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर राज्याच्या विविध कारागृहांतील दहा हजार कैद्यांना तात्पुरता जामीन, पॅरोलवर सोडण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कैद्यांना सोडल्यानंतर राज्यातील कारागृहे तुडुंब भरलेली असून, क्षमतेपेक्षा अद्यापही 11 हजार कैदी जास्त आहेत.

राज्यात नऊ मध्यवर्ती कारागृहे, 28 जिल्हा कारागृहे, 19 खुली कारागृहे व इतर चार अशी 60 कारागृहे आहेत. या कारागृहांत 24 हजार 32 कैदी ठेवण्याची सोय आहे; मात्र सध्या कारागृहात 35 हजार 136 कैदी आहेत. त्यामध्ये पाच हजार 703 कैदी शिक्षा झालेले आहेत. सुमारे 29 हजार 313 न्यायालयीन (कच्चे) कैदी आहेत; तर 120 जण स्थानबद्ध केलेले आहेत. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर राज्य सरकार व न्यायालयाच्या आदेशानुसार तात्पुरता जामीन व पॅरोलवर सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दहा हजार 788 कैद्यांना सोडण्यात आले आहे. त्यामध्ये आठ हजार 124 कैद्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले आहे. दोन हजार 664 कैद्यांना आत्पकालीन पॅरोलवर सोडण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दहा हजार कैदी सोडल्यानंतर ही राज्यातील कारागृहे तुडुंब भरली आहेत. यामध्ये नऊ मध्यवर्ती कारागृहांत क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी असल्याचे दिसून आले आहे. मध्यवर्ती कारागृहाची क्षमता ही 14 हजार 491 आहे; मात्र या ठिकाणी 25 हजार 348 कैदी ठेवण्यात आले आहे. राज्यात येरवडा मध्यवर्ती कारागृहात सर्वाधिक पाच हजार 930 कैदी असल्याचे समोर आले आहे. मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्यामुळे प्रशासनावर ताण निर्माण होत आहे; मात्र याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. राज्यातील अनेक जिल्ह कारागृहदेखील पूर्ण भरलेली असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा कारागृहाची क्षमता खूपच कमी असते. त्या जिल्हा कारागृहात मोठ्या प्रमाणात कैदी ठेवले जात असल्याचे दिसून आले आहे. चंद्रपूर जिल्हा कारागृहाची क्षमता 333 असता त्या ठिकाणी 548 कैदी ठेवले आहेत. यवतमाळ, वर्धा, धुळे, भायखळा, कल्याण, बुलडाणा, वाशीम, बीड, जळगाव, नांदेड, परभणी, नगर, सातारा, सोलापूर, सावंतवाडी, कोल्हापूर, भुसावळ ही कारागृहेही पूर्ण भरून गेली आहेत.

COMMENTS