कोपरगाव प्रतिनिधी -यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुकास्थित श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे तपासणी अधिकारी श्री अशोक चवळे, शाखा व्यवस्थापक श्री
कोपरगाव प्रतिनिधी -यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुकास्थित श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे तपासणी अधिकारी श्री अशोक चवळे, शाखा व्यवस्थापक श्री संजय दोरखंडे, श्री कविश्वर शास्रकार,श्री अनिल ठाकरे , लेखापाल श्री वैभव झाडे, लिपिक श्री राजेश दुधलकर, श्री अनिल वगारे आदी पदाधिकाऱ्यांनी समता नागरी सहकारी पतसंस्थेस ३० ऑगस्ट २०२१ रोजी सदिच्छा भेट दिली.उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचा संस्थेचे संचालक श्री संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी यथोचित सत्कार केला.
श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे तपासनीस अधिकारी श्री अशोक चवळे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातील समता पतसंस्था प्रत्येक विभागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी वेळेत ग्राहकांना सेवा देत आहे ही विशेष उल्लेखनीय बाब असून जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी पतसंस्था चळवळीत नावारूपाला येणारी महाराष्ट्रातील पहिलीच पतसंस्था असून सरकारी बँकांनाही लाजवेल असे ऑनलाईन फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम आणि स्टोर रूम ची संरचना आम्ही आमच्या संस्थेत अंमलात आणण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहोत. त्यावेळेस आम्हाला मार्गदर्शन करावे,अशी इच्छा व्यक्त केली.
मुख्य कार्यालयाच्या एच.आर.उज्वला बोरावके यांनी कार्यालयात चालणाऱ्या कामकाजाची माहिती दिली, ऑनलाईन फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम विषयी प्रमुख श्री संजय पारखे यांनी सविस्तर माहिती दिली,संस्थेच्या मुख्य कार्यालयासह विविध शाखांत वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती ई.डी.पी विभाग प्रमुख श्री योगेश आसने यांनी दिली.श्री जितेंद्र अमृतकर यांनी फंड विभागाची माहिती दिली. प्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी समता पतसंस्थेच्या प्रत्येक विभागास भेट देत विभागाची परिपूर्ण माहिती घेऊन समाधान व्यक्त करत संस्थेच्या प्रत्येक वापरत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचे विशेष कौतुक केले आणि समताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS