म्हाळुंगी पुलावरील 10 सुशोभीकरण कुंड्याची विकृत प्रवृत्ती कडून नासाडी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हाळुंगी पुलावरील 10 सुशोभीकरण कुंड्याची विकृत प्रवृत्ती कडून नासाडी

संगमनेर (प्रतिनिधी)   संगमनेर हे वैभवशाली व सुसंस्कृत शहर आहे. राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्ष सौ

धनादेश अनादर प्रकरणी लेखापरीक्षकाला एक वर्षाची शिक्षा ; आरोपी मुंबईतील लेखापरीक्षक
शेतकऱ्याच्या शेतात सापडली 47 पोती l पहा LokNews24
आई-वडिलांवर घातक शस्त्राने हल्ला करण्याचा डाव उधळला

संगमनेर (प्रतिनिधी)  

संगमनेर हे वैभवशाली व सुसंस्कृत शहर आहे. राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासातून वैभवाकडे जाणाऱ्या शहरात सातत्याने विकास कामे होत आहेत. म्हाळुंगी पुलाचे नूतनीकरणाचे काम नुकतेच झाले असून या पुलावर असलेल्या 10.सुशोभीकरण कुंड्यांचे काही विकृत प्रवृत्ती कडून नासाडी करण्यात आली असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे..

 याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर अकोले महामार्गावर असलेल्या माळून्गी पुलाचे नूतनीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे. संगमनेर शहरात सौ दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर,व  हरित संगमनेर ही संकल्पना राबवताना अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन केले जात आहे. तसेच विविध चौकाचौकांमध्ये सुशोभीकरण करण्यात आले आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संगमनेर हे अद्यावत वैभवशाली वाटते. त्यासाठी संपूर्ण सुसंस्कृत नागरिक संगमनेरकर सहकार्य करत असतात. मात्र काही विघातक प्रवृत्ती कडून सातत्याने चांगल्या कामाला गालबोट लावण्याचा प्रकार घडत असतो. शहरात अनेक ठिकाणी लावलेल्या झाडांना तोडण्याचे काम हे वाईट लोक करतात. तर कधी वाढत्या झाडांचे शेंडे खोडण्याचे काम करतात.  दर्शनी भागामध्ये विदरुपी करण  करणे अशी त्यांची उद्योग सातत्याने सुरू आहेत.

 याच बरोबर आता नव्याने माळून्गी नदीवर उभारण्यात आलेल्या सुशोभिकरण कुंड्यांची नासाडी केली आहे .यामुळे या वाईट प्रवृत्ती बदल संगमनेर शहरातून तीव्र संताप होत आहे . ही प्रवृत्ती वाढत असून ती वेळीच रोखली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक संगमनेरकर आणि पुढाकार घ्यावा आणि अशा व्यक्ती जर कुणाला आढळली तर तातडीने नगरपालिकेशी संपर्क करा असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे

COMMENTS