मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केस आज भाविकांना दर्शनास खुले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केस आज भाविकांना दर्शनास खुले

अहमदनगर/प्रतिनिधी- मोहंमद पैगंबर यांची जयंती ईद मिलादुन्नबी (झेंडा ईद) म्हणून मंगळवारी (दि.19 ऑक्टोबर) सर्वत्र उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्त दर

महसूलमंत्री थोरात म्हणाले… सामान्य जनता काँग्रेसशी निष्ठावान व प्रामाणीक
आमदार लंकेच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पाथर्डीत रास्ता रोको
पंतप्रधान मोदींचा विकासाचा अश्‍वमेध कुणी रोखू शकणार नाही

अहमदनगर/प्रतिनिधी- मोहंमद पैगंबर यांची जयंती ईद मिलादुन्नबी (झेंडा ईद) म्हणून मंगळवारी (दि.19 ऑक्टोबर) सर्वत्र उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे शहरातील टकटी दरवाजा (मीर मुर्तूजा टकटी दरवाजा महल-तख्ती दरवाजा) येथे मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केस (हजरत बाल) भाविकांच्या दर्शनासाठी मंगळवारी खुले केले जाणार आहेत.
यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या पवित्र केसाच्या दर्शनासाठी भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन येथील पुजारी सय्यद बुर्‍हाण कादरी चिश्ती यांनी केले आहे. नगरला परंपरेनुसार दरवर्षी फक्त हजरत मोहंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनीच पवित्र केस दर्शनासाठी खुले करण्यात येतात. याच दिवशी नगर शहरातून झेंड्याची मिरवणूक काढण्यात येवून, ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप केले जाते.

संदल-उरुस उत्साहात साजरा
कोतवाली पोलीस स्टेशन येथील सय्यद शहा बाबा दर्गाचा संदल-उरुस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दर्ग्याचे मुख्य पुजारी सय्यद बुर्‍हाण, सुनील वाघेला, आचु सय्यद, हादी सय्यद, शोएब शेख, गुलाम दस्तगीर, टिपू शेख, शहा फैसल, जावेद सय्यद, जावेद शेख, सलमान शेख, आरिफ पठाण, रमीज शेख, गौस शेख, बबलू शेख, शोहेब सय्यद, टिपू शेख आदींसह भाविक उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते दर्गाच्या मजारवर फुलांची चादर अर्पण करुन भंडार्‍याची सुरुवात करण्यात आली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी भंडार्‍याचा लाभ घेतला. संदल उरुस निमित्त दर्गाभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

COMMENTS