मोबाईल टॉवरची बॅटरी चोरणारे मोठे रॅकेट उघडकीस; सात आरोपी अटकेत; तिघे फरार, शोध सूरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोबाईल टॉवरची बॅटरी चोरणारे मोठे रॅकेट उघडकीस; सात आरोपी अटकेत; तिघे फरार, शोध सूरू

परभणी:ता.8- शहरासह जिल्ह्यातील मोबाईल टॉवरचे बॅटरी चोरी करणारे एक मोठे रॅकेट स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने शुक्रवारी रात्री उघडकीस आणले

असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात दाखल; प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत मुंबईत सोहळा
परभणीला कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून दूर ठेवण्यास प्रशासन प्रयत्नशील – जिल्हाधिकारी आंचल गोयल
Parbhani : मॉर्निंग वॉक करणाऱ्या चार नागरिकांना ट्रकने चिरडले…

परभणी:ता.8-

शहरासह जिल्ह्यातील मोबाईल टॉवरचे बॅटरी चोरी करणारे एक मोठे रॅकेट स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने शुक्रवारी रात्री उघडकीस आणले असून या रॅकेट कडून 40 बॅटरी ताब्यात घेतल्या आहेत. तसेच त्यातील सात आरोपींना अटकही केली आहे.

शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात मोबाईल टॉवरच्या बॅटरी तसेच पावर प्लांट चे मॉडेल चोरी झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या होत्या. त्या संदर्भात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागास या अनुषंगाने शुक्रवारी परभणीतील ग्रँड कॉर्नर परिसरात एक पिक अप वाहन संशयास्पदरीत्या आढळून आले. 

सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार,पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रँड कॉर्नर जवळील आर.के.हॉटेल समोर ही पिक अँप व्हँन ताब्यात घेऊन तपासणी केली त्यावेळी या व्हॅनमधून चोरी केलेल्या मोबाइल टॉवरच्या 40 बॅटरी व मोबाइल टॉवरच्या प्लांट चे मॉडेल आदी मुद्देमाला आढळून आला। संशयित आरोपींकडे चौकशी केली असता मोबाईल टॉवरचे बॅटरीचे मोठे रॅकेट उघडकीस आले, पोलिसांच्या या पथकाने या रॅकेटमध्ये दहा आरोपींचा समावेश असल्याचे नमूद केले आहे.त्यातील एकूण सात आरोपींना ताब्यात घेतले आहे. शहरातील नवा मोंढा तसेच चुडावा, सोनपेठ,बोरी, परभणी ग्रामीण, गंगाखेड,पूर्णा, ताडकळस व सेलू इत्यादी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दरम्यान या पथकाने या प्रकरणात अमजद खान मजिद खान पठाण ,शेख मोबीन शेख शकील, शेख नईम शेख अयुब, काली उर्फ शेख यासीन शेख, आवेश परवेज फारुखी, काली उर्फ शेख यासीन शेख रमजान व अन्य एक असे आरोपी स्पष्ट केले आहेत. नसिर अहमद नजीर अहमद,जफर अली हामेद अली सौगादर,जुबेर इशरतुल्ला अहमद, व अन्य एकास या आरोपींनी बॅटरी विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या आरोपीकडून एक लाख आठ हजार रुपयेरोख ,दोन वाहने,मोबाईल टॉवरच्या बॅटरी तसेच अन्य मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक आलेवार पोलीस उपनिरीक्षक  साईनाथ पुयड,पोलीस अमलदार हनुमंत जक्केवाड,तसेच बालासाहेब तूपसुंदरे,आशा सावंत,जयश्री आव्हाड,बालाजी रेड्डी,दिलावर पठाण,शेख अझहर, किशोर चव्हाण,वशिष्ठ बिकड अनिल कोनगुलवार, शेख रफीक, संतोष सानप,पठाण सय्यद मोबीन,गौस पठिण, तसेच खुपसे, घुगे,मुरकुटे सोनवणे यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले.

COMMENTS