मोठी घडामोड… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला…  युतीबाबत…?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी घडामोड… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला… युतीबाबत…?

प्रतिनिधी : मुंबई नक्षलवादी कारवयाचे वाढते प्रमाण आणि त्या कशा प्रकारे रोखल्या जाव्यात यासंदर्भात उपाययोजनांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह य

महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर रिक्षा
मंत्री चंद्रकांत पाटलांवर भाजपचे वरिष्ठ नेते नाराज
अमित शाहांचा ताफा जाण्यासाठी भररस्त्यात रुग्णवाहिकेला अडवलं

प्रतिनिधी : मुंबई

नक्षलवादी कारवयाचे वाढते प्रमाण आणि त्या कशा प्रकारे रोखल्या जाव्यात यासंदर्भात उपाययोजनांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. 

रविवारी 26 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे . तसेच या बैठकीत नक्षल प्रभावित राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील .

महाराष्ट्रातील नक्षलवादी कारवायांसंदर्भात सोमवारी त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली होती . नक्षलवादी कारवाया, नक्षलग्रस्त भागांचा विकास, शहरी नक्षलवाद या मुद्यांवर गृहमंत्री अमित शहा या बैठकीत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. 

राज्यातील राजकीय घडामोडी लक्षात घेता अमित शहा आणि उद्धव ठाकरे बैठकीनंतर स्वतंत्रपणे चर्चा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. हे पाहता पक्षासाठी रणनीती आखण्यासाठी राजकीय नेत्याच्या भेटीगाठी सुरु झाल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दौऱ्यावर जाणार आहेत. 

यावेळी ते केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार राजकीय वर्तुळात उलट – सुलट चर्चा रंगल्या आहेत . मात्र या भेटीचे कारण आता समोर आले आहे .

COMMENTS