मुख्यमंत्र्यांच्या मनात काय चाललंय, हे मला कसं कळणार?, नारायण राणेंची प्रतिक्रिया

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या मनात काय चाललंय, हे मला कसं कळणार?, नारायण राणेंची प्रतिक्रिया

प्रतिनिधी : मुंबईकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्र्यांच्या मनात काय चाललंय, हे मला कसं कळणार? मी ज्योतिषी नाही

दोन विद्यार्थिनी कोचिंगमधून बाहेर पडताच रस्त्यावर भिडल्या
 रवी माळवे यांनी केला अंध व मुकबधीरांसोबत वाढदिवस साजरा
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला मुस्लीम समाजाची ऍलर्जी, अन्यथा लोकशाही मार्गाने इलाज करू:- सुफियान मनियार

प्रतिनिधी : मुंबई
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्र्यांच्या मनात काय चाललंय, हे मला कसं कळणार?

मी ज्योतिषी नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमच्यासोबत यायचे असेल तर त्यांनी ‘उद्याचे सहकारी’

असा शब्दप्रयोग करायला हवा होता. त्यांनी स्पष्ट मत मांडायला हवे होते. त्यामुळे यावर काय बोलणार? नो कमेंट्स.” अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

कार्यक्रमात उपस्थित असलेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहून ‘भावी सहकारी’ म्हटले. त्यानंतर आता राज्यात सर्वत्र शिवसेना-भाजप युतीच्या चर्चा सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

COMMENTS