मुंबईत चार दिवस अतिवृष्टीचा इशारा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत चार दिवस अतिवृष्टीचा इशारा

मुंबईसह कोकणात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये 9 ते 12 जून या चार दिवसांत अतिवृष्टीचा होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

शेतकर्‍यांना 25%  टक्के अग्रीम पिक विमा रक्कम तात्काळ देण्यात यावी-अनिल जगताप
बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पेठ बीड भागाचा पाण्याचा दुष्काळ संपणार !

मुंबई / प्रतिनिधीः मुंबईसह कोकणात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये 9 ते 12 जून या चार दिवसांत अतिवृष्टीचा होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. अतिवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चार दिवसांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणार्‍या सर्व यंत्रणांनी, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज आणि सतर्क राहून काम करावे तसेच परस्परांशी योग्य समन्वय ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तिथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या तैनात कराव्यात, ओएनजीसीसह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणार्‍या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशार्‍यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची आढावा बैठक घेतली. मुंबईत ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साचते, अशा ठिकाणी 474 पंप बसवण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. या पंपाद्वारे साचलेल्या पाण्याचा निचरा केला जाईल. अतिवृष्टीच्या काळात पूर व्यवस्थापनासाठी ज्युनिअर इंजिनिअर स्पॉटवर राहून पाणी निचर्‍याचे काम करतील, असेही ते म्हणाले. हिंदमाताच्या परिसरात दोन मोठे टँक केले असून यामध्ये परिसरात साचलेले पाणी वळते करून साठवण्याची व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS