माझ्या जीवाला धोका… मला घेऊन चला… भाजप खासदाराच्या सुनेचा छळ… व्हिडीओ व्हायरल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माझ्या जीवाला धोका… मला घेऊन चला… भाजप खासदाराच्या सुनेचा छळ… व्हिडीओ व्हायरल

वेब टीम : मुंबईवर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने कुटुंबियांवर धक्कादायक आरोप केले आहे . रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबा

रामदास आठवलेंकडून शशी थरुर यांना इंग्रजीचे धडे | LOKNews24
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
चालू बसच स्टेअरिंग झालं लॉक अन् 26 जण जागीच ठार | LOK News 24

वेब टीम : मुंबई
वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने कुटुंबियांवर धक्कादायक आरोप केले आहे .

रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचे एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे .

इतकंच नाही तर त्यांनी आपला छळ होत असून आपल्याला मारहाण होत असल्याचा आरोप केला .

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे त्यांनी मदत मागितली आहे . हा व्हिडीओ रुपाली चाकणकर यांनी ट्विट केला. यात मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांच्याकडे मदत मागतेय.

माझ्या जीवाला धोका आहे इथे, प्लीज मॅडम मला इथून गेऊन चाल. मी रिक्वेस्ट करते, असे त्या म्हणत आहे . तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी पूजाच्या संरक्षणासाठी पोहोचल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली .

वर्धा भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुन गेली अनेक दिवस हे तडस कुटुंब मारहाण करुन अत्याचार करीत आहेत. पुजाचा आताच हा व्हिडिओ माझ्यापर्यंत आला आहे.

तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी व पोलीस संरक्षणासाठी पोहोचले आहेत, असे रुपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

COMMENTS