“माझे रेशन माझा अधिकार ” शिवसेनेने केला मंच स्थापन

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

“माझे रेशन माझा अधिकार ” शिवसेनेने केला मंच स्थापन

वाढत्या कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत अन्नधान्य वितरण करण्याबाबत  कोपरगांव शहर व ग्रामिण शिवसेनेने “माझे रेशन माझा अधिकार “असा मंच स्थापन करून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंत्यदोय अन्न योजना व

स्काऊटचे पुनुरुज्जीवन ही काळाची गरज- डॉ. सुधीर तांबे
धनगर आरक्षणप्रश्‍नी राज्यस्तरावर हालचाली सुरु    
हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लावा

कोपरगाव शहर प्रतिनिधी-  वाढत्या कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत अन्नधान्य वितरण करण्याबाबत  कोपरगांव शहर व ग्रामिण शिवसेनेने “माझे रेशन माझा अधिकार “असा मंच स्थापन करून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंत्यदोय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्याच्या शासनाने निर्णय घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे या मंच मार्फत करणार असल्याचे शिवसेनेचे उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी सांगितले आहे. 

    माझे रेशन माझा अधिकार  शहर समितीत कलविंदर डडीयाल, भरत मोरे, असलम  शेख, इरफान  शेख, गगन हाडा, प्रफुल्ल शिंगाडे, बाळासाहेब साळुंखे, अमजद शेख, विकास शर्मा तर ग्रामिण समिती मध्ये शिवाजी ठाकरे, रावसाहेब भिमाजी थोरात, श्रीरंग चांदगुडे, बाळासाहेब मापारी, बाळासाहेब  राऊत, सचिन आसणे, महेश कुलकर्णी, पंकज शिंदे आदी सदस्यांच्या नेमणुका केल्या असून नागरिकांना काही अडचण वाटल्यास वरील सदस्या सोबत संपर्क साधावा असे आवाहन झावरे यांनी केले आहे.n या वेळी झावरे यांनी सांगितले की,  प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना एप्रिल व मे २०२१ या दोन महिन्या  पैकी एक महिन्याचे प्रति सदस्य ३ किलो गहू दोन किलो तांदूळ तसेच आत्योदय योजने अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका ३५ किलो धान्य मोफत वितरण करण्यात येत आहे तसेच या योजनेतील माहे मे व जून २०२१ प्रति व्यक्ती पाच किलो अन्नधान्याचे मोफत वितरण करण्यात येणार आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घेऊन त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन झावरे यांनी केले आहे.

COMMENTS