माजी मंत्री राम शिंदेंना मोठा झटका… भाजपचा बडा नेता गेला राष्ट्रवादीत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री राम शिंदेंना मोठा झटका… भाजपचा बडा नेता गेला राष्ट्रवादीत

कर्जत : प्रतिनिधी भाजपाचे नेते नामदेव राऊत यांनी नुकताच भाजपाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. ते राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या संप

कर्जतमधील ६ दुकाने सील नगरपंचायतची धडक कारवाई ; व्यवसायिक संतप्त
रेहेकुरी वनक्षेत्रात काळविटाच्या शिकारीचा प्रयत्न
गांधी जयंतीनिमित्त तरडगाव ग्रामस्थांनी घेतली ग्रामस्वच्छतेची शपथ

कर्जत : प्रतिनिधी

भाजपाचे नेते नामदेव राऊत यांनी नुकताच भाजपाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. ते राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या संपर्कात होते. त्यांनी अखेर कार्यकर्त्यांसमवेत मुंबई येथे जावून उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

कर्जत- जामखेड मतदारसंघात आ. रोहित पवार यांनी मोठी राजकीय उलथापालथ घडवून आणली आहे. माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना धक्का देत कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांचा प्रवेश घडवून आणला आहे. राऊत हे मोठा जनसंपर्क असलेले नेते आहेत.

राऊत त्यांच्यासोबत सर्व समाजातील कार्यकर्त्यांचा मोठा गट असून मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये त्यांचा स्वतःचा असा कार्यकर्ता आहे. केवळ ओबीसी चेहरा नव्हे तर भविष्यातील आमदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. पंचवीस वर्षापासून भाजपचा आमदार निवडून आणण्यात राऊत यांचे मोलाचे योगदान होते.

कर्जत शहरामध्ये सर्वात शक्तिशाली व जनसंपर्क असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पक्षप्रवेश प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह कर्जत तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS