महिला नृत्यांगनांनाही लाजवेल अशी लावणी करतोय सोलापूरचा श्रीकृष्ण… (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला नृत्यांगनांनाही लाजवेल अशी लावणी करतोय सोलापूरचा श्रीकृष्ण… (Video)

लावणी म्हटलं की नृत्यांगणांच्या दिलखेचक अदा, घायाळ करणारे सौंदर्य हे ओघाने आलेच.. मात्र दक्षिण सोलापूर भागातील एक मुलगा नृत्यांगणांनाही लाजवेल असं ला

122 खासदार, आमदारांवर मनी लॉड्रिंगचे आरोप
ग्रामपंचायत निवडणूकीस यात्रा कालावधीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवा : पालकमंत्री
दादर येथे वसतिगृहात विद्यार्थाची आत्महत्या

लावणी म्हटलं की नृत्यांगणांच्या दिलखेचक अदा, घायाळ करणारे सौंदर्य हे ओघाने आलेच.. मात्र दक्षिण सोलापूर भागातील एक मुलगा नृत्यांगणांनाही लाजवेल असं लावणी नृत्य करतोय. हलाखीच्या परिस्थितीवर मात करत छंद जोपासताना विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमही तो करत आहे. त्याच्या या कलेचे सोलापूरसह राज्यभरात कौतुक होत आहे.

श्रीकृष्ण लक्ष्मण वाघमोडे असे या मुलाचे नाव आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील तो रहिवासी. शिक्षण एम कॉम झालेले. आई द्रौपदी मोलमजुरी करते. एक भाऊ बँकेत शिपाई आहे. तर श्रीकृष्ण स्वतः मेडिकल ऑडिट करत आहे. श्रीकृष्ण लहान असतानाच २००५ साली त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळी तो अवघ्या १३ वर्षांचा होता. आईने मोलमजुरी करून दोन्ही भावंडांना शिक्षण दिल. दोन बहिणींची लग्नही उरकली. 

लहानपणी लावणीसम्रादनी सुरेखा पुणेकर यांच्या लावण्या पाहण्याची आवड श्रीकृष्णला लागली. लहान वयातच त्याला लावणीचे वेड लागले. आता तो एक उत्कृष्ट डान्सर म्हणून प्रसिद्ध झाला आहे. अनेक ठिकाणी तो कोरिओग्राफीचीही कामे करतो. नृत्यक्षेत्रातील त्याच्या कामाबद्दल त्याला अनेक पारितोषिकेही मिळाली आहेत. अनेक शाळांच्या गॅदरिंगमध्ये त्याने नृत्य केले आहे. 

श्रीकृष्णला पुढे जाऊन लावणीत पी. एच. डी करायची आहे. लावणी ही कला मला फार आवडते. ही कला मी खूप लांबपर्यंत पोहचविणार असल्याचे तो आत्मविश्वासाने सांगतो. कला क्षेत्रात स्वतःच्या कलेने आपला वेगळा ठसा उमटविणारा श्रीकृष्ण कलाक्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी प्रेरणा ठरत आहे. त्याच्या या कार्याला लोक न्यूज २४ कडून सलाम… 

COMMENTS