Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांनाही देता येणार एनडीएची परीक्षा- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : देशातील महिलांनाही आता राष्ट्रीय सुरक्षा अकादमीची (एनडीए) परीक्षा देता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज, बुधवारी यासंदर्भात आदेश द

शिक्षकांच्या बदलीसाठी होणार सोमवारपासून प्रोफाईल अपडेट
कोविडच्या नव्या विषाणुसंदर्भात मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता
तलाठी भरतीवर पुन्हा प्रश्‍नचिन्ह

नवी दिल्ली : देशातील महिलांनाही आता राष्ट्रीय सुरक्षा अकादमीची (एनडीए) परीक्षा देता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज, बुधवारी यासंदर्भात आदेश दिला आहे. त्यानुसार मुलींना आगामी 5 सप्टेंबर रोजी होणाऱ्या एनडीएच्या प्रवेश परीक्षेला बसता येणार आहे. न्या. संजय किशन कौल आणि न्या. ऋषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने हा आदेश दिलाय.

एनडीए आणि नेव्हल अकॅडमी परीक्षेसाठी महिला उमेदवारांना परवानगी न देण्याच्या केंद्राच्या धोरणाला आव्हान देणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने भारतीय सैन्याच्या भेदभाव करणाऱ्या धोरणांमुळे ‘सहशिक्षण’ ही समस्या का आहे, असा प्रश्न विचारला. एनडीए परीक्षेचा निकाल याचिकेतील अंतिम निकालाच्या अधीन असेल, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. तसेच या परीक्षेसंदर्भात एक नवीन अधिसूचना जारी करण्याचे आणि त्याला योग्य प्रसिद्धी देण्याचे आदेश कोर्टाने यूपीएससीला दिले आहेत.

तर, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी सांगितले की, सैन्य प्रवेशाच्या तीन पद्धतींपैकी स्त्रियांना भारतीय मिलिटरी अकादमी (आयएमए) आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीतून लष्करात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. हा निर्णय राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून घेण्यात आला होता, असे भाटी म्हणाल्या. यावर “सैन्याचे धोरण लिंगभेदावर आधारित आहे”, असे खंडपीठाने म्हटले. याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील चिन्मय प्रदिप शर्मा यांनी केंद्र सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रापबद्दल प्रश्न केला. त्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की “महिलांना या परीक्षेतून वगळणे हा पूर्णपणे धोरणात्मक निर्णय आहे आणि न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करू नये. मुलींना एनडीएमध्ये प्रवेशास परवानगनाही याचा अर्थ असा नाही की त्यांच्या प्रगतीमध्ये किंवा त्यांच्या करिअरमध्ये कोणतीही अडचण आहे.” यावर कायमस्वरूपी आयोगाच्या निर्णयानंतरही लष्कराची मानसिकता बदलत नसल्याचे न्यायालयाने म्हंटले.

यावेळी न्यायमूर्ती कौल यांनी म्हटले की, “जोपर्यंत न्यायालयीन हस्तक्षेप होत नाही तोपर्यंत लष्कर ‘स्वेच्छेने काहीही करण्यात विश्वास ठेवत नाही’. यावेळी त्यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या सरकारला लघु सेवेतील अधिकाऱ्यांना कमांड पोस्टिंगसह लष्करात कायमस्वरूपी कमिशन देण्यात यावे, या निर्णयाचा संदर्भ दिला. तुम्ही स्वतःहून कधीतरी सुरुवात केली पाहिजे. नेहमीच न्यायालयाला हस्तक्षेप करण्यास भाग पाडू नका! आम्ही, एक संस्था म्हणून हे कबूल करतोय की कदाचित आम्ही तुमच्या संरचनेचे गुंतागुंतीचे, तांत्रिक पैलू समजू शकणार नाहीत. परंतु तुम्ही लैंगिक समानतेचे व्यापक तत्त्व समजून घेऊन तुमच्या वेगळेपणासोबत ते जुळवून घेतले पाहिजे असंही न्यायमूर्ती कौल यांनी सांगितले.

COMMENTS