महिलांच्या कौतुकाने अजितदादा झाले भावुक… डोळ्यात आले अश्रू…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांच्या कौतुकाने अजितदादा झाले भावुक… डोळ्यात आले अश्रू…

बारामती : प्रतिनिधी बारामती येथे दौऱ्यावर असताना अजित पवार यांचे महिलांनी ‘अजित दादा तुमचं काम एक नंबर’ असे म्हणत तोंडभरून कौतूक केले.  वि

आईने केली दहा वर्षांच्या चिमुरड्याची हत्या | LOKNews24
पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
आता मुलींच्या लग्नाचे वय 18 वरून 21 वर्ष DAINIK LOKMNTHAN

बारामती : प्रतिनिधी

बारामती येथे दौऱ्यावर असताना अजित पवार यांचे महिलांनी ‘अजित दादा तुमचं काम एक नंबर’ असे म्हणत तोंडभरून कौतूक केले. 

विशेष म्हणजे या कौतुकानंतर पवार चांगलेच भावुक झाले. या महिलांचे आभार मानताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

उपमुख्यंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची बहीण, मुलगा तसेच निकटवर्तीय यांची कार्यलये, कंपन्यांवर आयकर विभागाने छापे टाकले. या छापासत्रानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच बारामतीत आले. 

अजित पवार नेहमीच लोकांच्या संपर्कात असतात. जनतेच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष लोकांना भेटण्याकडे त्यांचा कल असतो. आज पवार बारामतीमध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. 

वृक्षारोपण करताना अजित पवार यांच्या आजूबाजूला बऱ्याच महिला हजर होत्या. या महिलांनी अजित पवार यांचे तोंडभरून कौतूक केले. ‘अजितदादा तुमचे काम एक नंबर आहे. 

तुम्ही खूप छान काम करता. तुम्ही खूप मोठे व्हा. यशस्वी व्हा. आमच्या सर्वांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत,’ अशा शब्दांत महिलांनी अजित पवार यांचे कौतुक केले. 

विशेष म्हणजे महिलांनी स्तुती करताच अजित पवार भावुक झाले. त्यांनी महिलांसमोर थेट हात जोडले. तसेच तुम्ही निवडून देता म्हणून मी काम करतो, असे म्हणत अजित पवार यांनी महिलांचे नम्रपणे आभार मानले.

COMMENTS