महिलांच्या आरोग्यावर संपुर्ण कुटुंबाचे आरोग्य निर्भर -संतोष माणकेश्‍वर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांच्या आरोग्यावर संपुर्ण कुटुंबाचे आरोग्य निर्भर -संतोष माणकेश्‍वर

अहमदनगर (प्रतिनिधी)-  महिलांच्या आरोग्यावर संपुर्ण कुटुंबाचे आरोग्य निर्भर असते. कुटुंबात व्यस्त असलेल्या महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.

एसबीसी प्रवर्गाच्या साप्ताहिक आंदोलनात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
शाश्‍वत विकासासाठी बायोटेक्नॉलॉजी उत्तम पर्याय ः मोम्ना हेजमदी
काष्टीत 15 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पिस्तुल चोरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

महिलांच्या आरोग्यावर संपुर्ण कुटुंबाचे आरोग्य निर्भर असते. कुटुंबात व्यस्त असलेल्या महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. धावपळीचे जीवन, बदलती जीवनशैली आणि व्यायामाच्या अभावामुळे आजारांचे प्रमाण वाढत असून, याकडे महिलांनी लक्ष देण्याची व आरोग्याबाबत जागृत राहून नियमीत तपासणी करुन घेण्याचे आवाहन लायन्सचे विभागीय अध्यक्ष संतोष माणकेश्‍वर यांनी केले.

लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, अहमदनगर प्राईड व सेवाप्रितच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी माणकेश्‍वर बोलत होते. प्रारंभी धन्वंतरीचे पूजन व दीपप्रज्वलनाने शिबीराची सुरुवात करण्यात आली. यावेळी लायन्सचे अध्यक्ष डॉ अमित बडवे, लायन्स अहमदनगर प्राईडच्या अध्यक्षा गगनकौर वधवा, सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, सेवाप्रीतचे ग्रुप लीडर रितू वधवा, सचिव सुनिल छाजेड, खजिनदार विपुल शाह, डॉ. सिमरनकौर वधवा, देवेंद्रसिंह वधवा, आनंद बोरा, प्रिया बोरा, अमरजितसिंह वधवा, देवेंद्रसिंह वधवा आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात डॉ. सिमरनकौर वधवा यांनी महिलांचे आरोग्य उत्तम असल्यास कुटुंबाचे आरोग्य देखील उत्तम राहण्यास मदत होणार आहे. आरोग्य उत्तम असल्यास जीवन आनंदीमय बनते. आजारी पडल्यावर दवाखान्यात जाण्यापेक्षा आजारी पडू नये, यासाठी दवाखान्यात जाऊन वेळोवेळी आरोग्य तपासणी करुन आजार टाळण्याचे त्यांनी सांगितले. 

तर महिलांसाठी लायन्सच्या माध्यमातून दरवर्षी सेवासप्ताहातंर्गत हा उपक्रम घेतला जात असल्याचे स्पष्ट केले. पाहुण्यांचे स्वागत गगनकौर वधवा यांनी केले.  डॉ अमित बडवे यांनी आनंदी जीवनासाठी शारीरिक स्वास्थ्य महत्त्वाचे ठरते. वेदनादायी दीर्घ आयुष्यापेक्षा आरोग्यदायी जीवन उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. जागृती ओबेरॉय यांनी कोरोनाच्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात असून, त्यांना अशी आरोग्य शिबीरे आधार ठरत आहे. शिबीराच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सदृढ राहण्यास मदत होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

रामचंद्र खुंट येथील डॉ.सिमरन वधवा केअर अ‍ॅण्ड क्युअर सेंटर येथे झालेल्या या शिबीरात महिलांची कॅल्शियम, रक्तातील हिमोग्लोबीन, थायरॉईड व नसांची तपासणी करण्यात आली. दिवसभर चाललेल्या या शिबीरास महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरजितसिंह वधवा यांनी केले. आभार धनंजय भंडारे यांनी मानले.  

COMMENTS