महावितरणचा शॅाक! १७ पाणी पुरवठा योजना बंद; आमदार करतात काय ?: माजी आमदार स्नेहलता कोल्हे

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

महावितरणचा शॅाक! १७ पाणी पुरवठा योजना बंद; आमदार करतात काय ?: माजी आमदार स्नेहलता कोल्हे

ऐन उन्हाळ्यात महावितरणचा शॅाक,१५ ग्रामपंचायतीच्या १७ पाणी पुरवठा योजना बंद झाल्यात मग आमदार करतात काय ? असा संतप्त सवाल भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.

संभाजी ब्रिगेडकडून रक्ताभिषेक आंदोलन करुन प्रशासनाचा निषेध
अशोक कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी पुंजाहरी शिंदे
कोतवालीचे पोलिस करणार आता बोठेची सखोल चौकशी ; नगरच्या विनयभंग गुन्ह्यात झाला वर्ग

कोपरगाव  शहर प्रतिनिधी:   ऐन उन्हाळ्यात महावितरणचा शॅाक,१५ ग्रामपंचायतीच्या १७ पाणी पुरवठा योजना बंद झाल्यात मग  आमदार करतात काय ? असा संतप्त सवाल भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे. 
मतदार संघात थकीत वीज बिल न भरणाऱ्यांच्या विरोधात महावितण विज कंपनीने आक्रमक भूमिका घेत सरसकट वीज तोड मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेंतर्गत महावितरणने  १५ ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणा-या जलवाहिनींची वीजतोडणी केली आहे. परिणामी वीज तोड केलेल्या अनेक गावांमधील पाणी पुरवठा योजना बंद झाल्याने ऎन उन्हाळ्याच्या तोंडावर नागरीकांना पाण्यापासून वंचीत राहावे लागत आहे. 
याचा मोठा फटका सध्या ग्रामीण भागातील  नागरीक व  महिला भगिनींना ना मोठ्या प्रमाणावर बसला असल्याचे भयावह चित्र आहे. मग तालुक्याचे आमदार करतात काय ? असा सवाल   त्यांनी केला गेल्या वर्षापासून कोरोना सारख्या आजाराने थैमान घातले असून लोकांना आर्थिक उत्पन्नाचा मोठा फटका बसला आहे. त्यात पुन्हा कोरोनाने  डोके वर काढले आहे अशा परिस्थितीत   लोकप्रतिनिधीने लोकांना दिलासा देण्याची गरज आहे परंतु या उलट आज ऐन उन्हाळ्यात लोकांना पाण्यासाठी भटकंती करणे म्हणजे जिवावर बेतण्यासारखे  आहे.  धोंडेवाडी येथील पाणी योजना  वीज बिलाच्या थकबाकी पोटी कायमस्वरूपी बंद करण्यात आली होती परंतु  आम्ही आमदार असताना नागरिकांचा व त्या योजनेवरील गावांचा विचार करून  आमचे सरकार असताना महावितरण वीज कंपनी व सरकार यांच्याबरोबर  भांडून तडजोड करून ती योजना पूर्ववत सुरू केली होती त्याच धर्तीवर आपण या बंद करण्यात आलेल्या १५ ग्रामपंचायतीच्या १७ योजना तातडीने सुरू कराव्यात.  आज सरकार तुमचे आहे ऊर्जामंत्री तुमच्या पक्षाचा व तुमच्याच जिल्ह्यातील आहे  तेव्हा  याप्रकरणी आमदारांनी तातडीने तडजोड करून या पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरू कराव्यात अशी मागणीही माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे. दुसरीकडे ग्रामपंचायतींनी नागरीकांना पाणी पुरवठा करणारी विहीरी, पाण्याच्या टाकी यासाठी वीज जोड घेतले आहेत. मात्र मागील अनेक वर्षापासून अनेक ग्रामपंचायतींनी वीज बिले भरली नाहीत. लाखो रूपयांची वीज बिले थकीत आहेत. तालुक्यातील १५  ग्रामपंचायतींनी वीज बिल न भरल्याने अंदाजे ३६ लाख रूपयांच्या आसपास बिले थकीत आहेत.
यामुळे महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचा-यांनी थकीत बिल असणाऱ्यांचा वीजपुरवठा तोडून तो बंद केला आहे. परिणामी वीज तोड केलेल्या अनेक गावांमध्ये सध्या पाणी पुरवठा योजना बंद आहेत. जलयोजनेचा वीज पुरवठा बंद झाल्याने नागरीकांना पिण्याच्या पाण्यावाचून वंचित रहावे लागत आहे. यामुळे ऎन उन्हाळ्यांच्या तोंडावर नागरीकांना विहीरीवरून दुरवरून पाणी आणण्याची वेळ आली आहे.
वीज तोड केलेल्या गावांमध्ये येसगाव, अंचलगाव, माहेगाव देशमुख, कुंभारी, हिंगणी, करंजी, मळेगाव थडी कारवाडी मंजूर, वेळापूर, चासनळी, हंडेवाडी, वडगाव, कोळगाव थडी,  सडे, धोंडेवाडी आदी ग्रामंपचायतींचा समावेश आहे.

COMMENTS