महाविकास आघाडी सरकार हे ‘पुलोद’ची पुनरावृत्ती – खा.राऊत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकार हे ‘पुलोद’ची पुनरावृत्ती – खा.राऊत

नाशिक : दिल्लीत डोमकावळ्यांची फडफड असते. मात्र, आमचं सरकार पाडण्याची सुपारी ते फोडू शकत नाही. देशात उत्तमरीत्ता चालणारे सरकार उद्धव ठाकरेंचं आहे. कोण

पालखी मार्गावर मोबाईल टॉयलेट उभारा
कैद्यांमध्ये गोळीबार, तिघे ठार
विजेच्या लपंडावामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान

नाशिक : दिल्लीत डोमकावळ्यांची फडफड असते. मात्र, आमचं सरकार पाडण्याची सुपारी ते फोडू शकत नाही. देशात उत्तमरीत्ता चालणारे सरकार उद्धव ठाकरेंचं आहे. कोणी कितीही फड फड केली तरी त्यांचे पंख झडतील. सीबीआय, ईडी हे सगळं वापरून झालं असेल तर हे सरकार पाडण्यासाठी सैन्य बोलवा तरी सरकार पडणार नाही, असा हल्लाबोल शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी भाजपवर करत अशा प्रकारचं सरकार पुलोद काळात पवार साहेबांच्या नेतृत्वात तयार झालं होतं.आत्ताच सरकार हे पुलोदची पुनरावृत्ती असून अनेक पक्ष एकत्र आले असल्याचे ते म्हणाले.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शनिवारी (दि.२३) ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अंमली पदार्थावरुन भाजपचा समाचार घेताना महाराष्ट्र् तुळसी वृंदावन आहे.काहींना वाटत इथे गांजा पिकतो असा टोला त्यांनी भाजपला लगावला. नवाब मलिक यांना मी चांगलं ओळखतो त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले ते न्यायालयात योग्य की अयोग्य ठरतील. त्या कारवाईत जे पंच वापरले ते भाजपचे होते. ते फरार आहे.अशा प्रकारची कारवाई मी कधी बघितली नाही. नवाब मलिक यांनी जी माहिती समोर आणली त्याला प्रतिवाद करावा लागेल. त्यांचे माहितीचे सोर्स योग्य असतील.दूध की दूध पाणी की पाणी लवकरच होईल, असे सांगितले. सोमय्या यांच्याबद्दल बोलताना माहीत नसेल तर मी सांगतो पवार हे मोदींचे गुरू आहे.ते जाहीर पणे सांगता की पवारांच्या बोट धरूनच मोठा झालोय.मी ठाकरे आणी पवारांचा प्रवक्ताच आहे. ठाकरे देशाचे नेते असल्याचे त्यांनी सांगितले.

अमित शहांनी जम्मूतच रहावे

आम्ही हिंदुत्ववाचे पुराणपुरुष आहोत.आम्ही बाबरी पाडली तेंव्हा आम्ही केली नाही असं म्हणालो नाही. बांगलादेशमधील हिंदूना संरक्षण द्या ही मागणी करणं चुकीचं आहे का?काल पर्यन्त १९ शिखांच्या हत्या झाल्या. त्यावर प्रश्न उपस्थित करणं दारिद्र्य आहे का ?गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीर मध्येच राहावं म्हणजे दबाव तयार होईल असा उपरोधिक टोला खा.राऊत यांनी लगावला.

COMMENTS