महाराष्ट्रात दहावीची परीक्षा रद्द करणे अवघड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात दहावीची परीक्षा रद्द करणे अवघड

केेंद्रीय शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा रद्द केल्याने महाराष्ट्रातही दहावीची परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आष्टा येथे शाळेची व्हॅन कॅनॉलमध्ये कोसळली; अकरा विद्यार्थी जखमी
राष्ट्रीय महामार्ग 361 फ खरवंडी ते नवगण राजुरी वर ब्रम्हनाथ येळम शिवारात भीषण अपघात एक जण जागीच ठार
Akola : जिल्हा परिषदच्या बंद गोडाऊनला भीषण आग | LOKNews24

मुंबई/प्रतिनिधीः केेंद्रीय शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा रद्द केल्याने महाराष्ट्रातही दहावीची परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीची परीक्षा रद्द करण्याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे जाहीर केले असले, तरी केंद्रीय शिक्षण मंडख आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, विद्यार्थी संख्या यात मोठी तफावत असून दहावीची परीक्षा रद्द होणे अवघड दिसते. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द केली आहे. याच आधारावर महाराष्ट्रातही राज्य शिक्षण मंडळ म्हणजेच एसएससी बोर्डाची दहावीची लेखी परीक्षा रद्द करण्याबाबत तज्ज्ञांशी बोलून निर्णय घेऊ, असे गायकवाड यांनी म्हटले आहे. सीबीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द केल्याने एसएससी बोर्ड परीक्षा रद्द करणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. याविषयी गायकवाड म्हणाल्या, की सरकारसाठीही विद्यार्थ्यांची सुरक्षा ही प्राथमिकता आहे. त्यामुळे सीबीएसईप्रमाणेच परीक्षा रद्द करून ऑब्जेक्टिव्ह आणि इंटरनल असेसमेंट घेण्याबाबत आम्ही अभ्यास करू आणि तज्ज्ञांशी बोलू. सीबीएसई बोर्डाने दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल वस्तुनिष्ठ निकष पद्धतीच्या आधारे जाहीर करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. दहावीचे जे विद्यार्थी मिळालेल्या गुणांवर समाधानी नसतील त्यांना योग्य परिस्थिती असेल, तेव्हा पुन्हा परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात येईल. वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारावर म्हणजे केंद्रीय बोर्ड काही वेगळ्या पर्यायांचा विचार करत आहे असे दिसते. यात इंटरनल असेसमेंट, प्रोजेक्ट्स, असाईनमेंट्स किंवा ऑब्जेक्टिव्ह असे पर्याय असू शकतात. वर्षभरात शालेय स्तरावर घेतलेल्या अशाच परीक्षांच्या गुणांवरही निकाल जाहीर करू शकतात.

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हातात अकरावी आणि बारावी असे दोन वर्ष आहेत. या दोन वर्षांत ते आणखी मेहनत घेऊ शकतात. अभ्यास करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने हा निर्णय योग्य आहे. सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये लेखन पद्धती, प्रकल्प आणि वस्तुनिष्ठ अभ्यासक्रमावर भर दिला जातो. त्यामुळे वर्षभरात शाळेतील अशा विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या परीक्षा होत असतात. या गुणांच्या आधारे सीबीएसई निकाल जाहीर करू शकते. अकरावीची प्रवेश प्रक्रिया साधारण जून अखेर ते जुलै महिन्यापासून सुरू होते. त्यामुळे यानुसारच सीबीएसई बोर्ड दहावीचा निकाल जाहीर करेल. एसएससी बोर्डाची परीक्षा 29 एप्रिल ते 21 मेपर्यंत होणार होती. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. एसएससी बोर्डाला दहावीची परीक्षा रद्द करायची असल्यास अकरावीचे प्रवेश कशाच्या आधारावर होणार, हे आधी ठरवावे लागेल असे शिक्षणतज्ज्ञ सांगतात. सीबीएसई बोर्डाच्या बहुतांश शाळांची स्वत:ची कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना ते प्राधान्य देऊ शकतात; पण एसएससी बोर्डाची विद्यार्थीसंख्या ही सीबीएसईच्या तुलनेत पाच पटींनी जास्त आहे. एसएससी बोर्डाच्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शाळांना जोडलेली कनिष्ठ महाविद्यालये अपुरी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याला अकरावी प्रवेशासाठी शाळेबाहेर पडावे लागते.

राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होते. गुणवत्तेच्या आधारे होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षाही एकसमान पातळीवर घेणे एसएससी बोर्डासाठी नियमानुसार अनिवार्य आहे. राज्य शिक्षण मंडळासाठी परीक्षा न घेणे हा पर्याय अडचणीचा ठरू शकतो. कारण परीक्षा न घेता निकाल कशाच्या आधारावर जाहीर करणार? आणि प्रवेश कसे देणार? एसएससी बोर्डाच्या प्रश्‍नपत्रिकांचा आराखडा हा लेखी स्वरुपात असतो. शिवाय, अकरावीत प्रवेशासाठी निकाल आवश्यक आहे. तेव्हा बोर्डाला परीक्षा रद्द करण्यापूर्वी ठोस पर्याय शोधावा लागेल. ऑब्जेक्टिव्ह परीक्षा पद्धती अवलंबण्यासाठी आपल्याकडे सर्व विद्यार्थ्यांकडे इंटरनेट आणि संगणक किंवा मोबाईलची सुविधा असणे गरजेचे आहे. ही यंत्रणा तातडीने उभी राहू शकत नाही असे स्वत: शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. आपल्याकडे केवळ 20 गुणांची इंटरनल परीक्षा झाली आहे. त्यामुळे केवळ त्या आधारावर पूर्ण निकाल जाहीर करता येणार नाही. गेल्या महिन्यात बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, नाशिक जिल्ह्यांत ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी केली होती; पण ग्रामीण भागात ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नाही. राज्यात कोरोनाचा उद्रेक होत असताना आणि आरोग्य व्यवस्थेवरील ताण पाहता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नये, अशी भूमिका विद्यार्थी आणि पालक संघटनांची आहे.

पर्यायांचा विचार

परिस्थिती अपवादात्मक आहे त्यामुळे त्यावर उपाय काढण्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागेल. शिक्षण विभाग काही पर्यायी परीक्षा पद्धतींचा विचार करू शकते. प्रत्येक विषयाचे एकूण गुण कमी केले, तर एका दिवसातही ही परीक्षा घेता येणे शक्य आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणी रखडणार नाही. निकाल वेळेत जाहीर होईल आणि पुढील शैक्षणिक वर्षासाठी तयारी करण्यास आपल्याला पुरेसा वेळ मिळेल. असे असले, तरी दहावीच्या परीक्षेवर डिप्लोमा अभ्यासक्रम, आयटीआय प्रवेश अवलंबून असतात. परीक्षाच घेतली नाही, तर त्यातून मार्ग कसा काढायचा, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

COMMENTS