महाराष्ट्रात उद्यापासून मर्यादित टाळेबंदी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात उद्यापासून मर्यादित टाळेबंदी

महाराष्ट्रात टाळेबंदी लागणार की नाही, अशी धाकधूक लागलेली असतानाच आता एक मोठी शक्यता समोर आली आहे.

डॉ. रामदास आव्हाड यांची आठव्यांदा राष्ट्रीय आयुर्वेद गुरुपदी निवड
पालघर जिल्ह्यात ड्रोनद्वारे लस वाहतूक यशस्वी
कॅन्सरग्रस्तांसाठी म्हाडाच्या खोल्या राखीव ठेवण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्रात टाळेबंदी लागणार की नाही, अशी धाकधूक लागलेली असतानाच आता एक मोठी शक्यता समोर आली आहे. महाराष्ट्रात येत्या दोन एप्रिलपासून मर्यादित टाळेबंदी  लावण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती आहे; मात्र ही टाळेबंदी मागच्या टाळेबंदीहून काहीशी वेगळी असेल. 

या टाळेबंदीचे स्वरुप 50 टक्के टाळेबंद आणि 50 टक्के निर्बंध असे असतील. मागील वर्षी म्हणजेच 25 मार्च 2020 रोजी देशात पहिली टाळेबंदी लागू करण्यात आली होती. 25 मार्च ते 14 एप्रिल असा 21 दिवसांचा टाळेबंदी लागू करण्यात आली होती. पुढे  ही टाळेबंदी वाढत वाढत गेली. टाळेबंदीच्या वर्षानंतरही अजूनही कोरोनाचे थैमान सुरूच आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरात दररोज 30 हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पुन्हा टाळेबंदीची टांगती तलवार राज्यावर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत टाळेबंदीच्या निर्णयाबाबत चर्चा झाल्याचे समजते. त्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदीचे नियोजन करण्याचे निर्देश दिले होते.

आधीच्या टाळेबंदीमध्ये सगळ्याच गोष्टी बंद करण्याचे आदेश होते. तर टाळेबंदीमध्ये फक्त गर्दीची ठिकाणे बंद केली जातील. शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्स, समुद्र किनारे, गार्डन्स, नाट्यगृह आदी बंद करण्यात आली आहे. जिथे जिथे तुम्ही विरंगुळ्यासाठी जाता, ती सगळी ठिकाणे बंद केली जातील. मागची टाळेबंदी ही सलग होती. म्हणजे, 24*7 सगळं बंद ठेवण्याचे आदेश होते; मात्र आताच्या टाळेबंदीला विशिष्ट वेळ दिली जाण्याची शक्यता आहे. रात्रीची संचारबंदी न लावता दिवसा संचारबंदी लावण्याची तयारी प्रशासन करीत आहे. शिवाय ही टाळेबंदी अगदी 5 किंवा 7 दिवसांचा असू शकतो. दीर्घ कालावधीचा टाळेबंदी नसेल अशी प्राथमिक माहिती आहे. या टाळेबंदीमध्ये भाजीपाल्याच्या बाजारपेठा आणि किराणा दुकाने एका विशिष्ट वेळेत उघडी ठेवण्याची मुभा असेल. जेणेकरुन अन्नधान्याचा कुठलाही तुटवडा होणार नाही. शिवाय दुकानदार, शेतकरी यांचेही नुकसान होणार नाही, याची काळजी सरकार घेणार आहे. आंतरजिल्हा बस बंद करण्याचा निर्णय परिस्थिती खूपच खराब झाली तर घेतला जाईल, असे सरकारी सूत्रांकडून सांगितले जाते. आंतरजिल्हा वाहतूक बंद केली तर औद्योगिक आणि कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान होते. ते यंदा होऊ न देण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे.

गर्दीच्या ठिकामी कोरोना चाचण्या

रेल्वेस्टेशन्स, विमानतळ, बसस्थानके येथे कोरोना चाचण्या करण्याचे धोरण सरकारने ठरवले आहे. जास्तीत जास्त चाचण्या करून कोरोना रुग्णांना वेगळे करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. शिवाय, लसीकरणाचीही गती वाढवून निवडणुकांच्या धर्तीवर लसीकरण केले जाणार आहे. लोकांना लसीकरण बूथपर्यंत आणण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून स्वयंसेवकांना नेमण्याचाही विचार सरकार करते.

COMMENTS