महापालिकेने सुरू केली निवडणुकीची तयारी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापालिकेने सुरू केली निवडणुकीची तयारी

आगामी निवडणुकीची तयारी पुणे महापालिकेनेही सुरू केली आहे. महापालिकेने निवडणूक विभागाचे कामकाज घनकचरा विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांच्याकडे सोपवला आहे.

कोतुळेश्‍वरमध्ये भाविकांना महाप्रसादाचे वाटप
धावपळीच्या युगामध्ये मैदानी खेळ महत्त्वाचे ः सुधाकर वक्ते
डिजेच्या तालावर नाचताना विजेचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू.

पुणे / प्रतिनिधीः आगामी निवडणुकीची तयारी पुणे महापालिकेनेही सुरू केली आहे. महापालिकेने निवडणूक विभागाचे कामकाज घनकचरा विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांच्याकडे सोपवला आहे. मतदारयादी, आरक्षण सोडती व निवडणुकीच्या प्रक्रियेची जबाबदारी देशमुख यांच्या खांद्यावर असेल. 

महापालिकेसाठीच्या सार्वत्रिक निवडणुका फेब्रुवारी 2022मध्ये होणार आहेत. त्या दृष्टीने प्रभागरचना कशी असेल, यावर अद्यापही तर्कवितर्क लढवले जात आहेत. याच वेळी महापालिका प्रशासनाने मात्र, आपल्याकडून तयारीस सुरुवात केली आहे. त्यामुळेच देशमुख यांच्याकडे निवडणूक विभागाचे कामकाज सोपविण्यात आले. सध्या महापालिकेचे मालमत्ता व्यवस्थापन प्रमुख उपायुक्त राजेंद्र मुठे निवडणूक विभागाचाही कार्यभार सांभाळत होते. उपजिल्हाधिकारी पदावरून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या मुठे यांची पदोन्नती झाली असून, त्यांना लवकरच नवी नियुक्ती दिली जाईल. उपजिल्हाधिकारी असलेले अजित देशमुख सहा महिन्यांपूर्वीच प्रतिनियुक्तीवरच महापालिकेत रुजू झाले आहेत. त्यामुळे मुठेंनंतर ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाचा कहर आता कमी होत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे औरंगाबाद, नवी मुंबई, वसई-विरारसह काही महापालिकांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही तेथील निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या.

निवडणूक लांबणीवर?

सध्या कोरोनाची लाट आटोक्यात आल्याचे चित्र असले, तरी संभाव्य तिसर्‍या लाटेचीही शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच ’ओबीसीं’चे राजकीय आरक्षण, मराठा आरक्षण आदी मुद्दे प्रलंबित आहेत. त्यामुळे पुणे, मुंबईसह अन्य महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची चर्चा आहे. असे असले, तरी महापालिका प्रशासनाने मात्र आपल्या स्तरावर तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

COMMENTS