महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले : काँग्रेस

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले : काँग्रेस

सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी.

अहमदनगर जिल्ह्यातील 9 हजार 356 शेतकर्‍यांचे वीजबिल झाले कोरे
तायक्वांदो स्पर्धेत तिघांनी पटकावले सुवर्णपदक
सहकारी पतसंस्थांची थकबाकी वसुलीसाठी पोलिस सरंक्षण द्या

कोपरगाव शहर प्रतिनिधी- सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी. तसेच केंद्र सरकारने शेतकरी, कामगार विरोधी केलेले काळे कायदे रद्द करावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. शेतकरी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे कोपरगांव काँग्रेसचे वतीने याबाबतचे निवेदन तहसीलदार श्री योगेश चंद्रे यांना काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले.

मुंबईत प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले तसेच काँग्रेस मंत्री ना.बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे यांच्यासह काँग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांनी भारत बंदला ठीकठिकाणी निवेदने  भारत बंदला पाठिंबा देण्यात आला.कोपरगांव तहसिल मध्ये आज निवेदन दिले त्यावेळी  जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे, तालुकाध्यक्ष नितीनराव शिंदे, सेवा दलाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर भगत,उपाध्यक्ष विष्णू पाडेकर, विजयराव जाधव, महिला तालुका अध्यक्ष अडॅ .शितल देखमुख, रौनक अजमेरे, चंद्रहार जगताप आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS