मला ईडीची नोटीस दिली आणि संबंध महाराष्ट्राने भाजपाला येडी ठरवल…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मला ईडीची नोटीस दिली आणि संबंध महाराष्ट्राने भाजपाला येडी ठरवल…

सोलापूर :- प्रतिनिधी शरद पवारांनी त्यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) पाठवलेल्या नोटिसीची आठवण सांगितली. ‘विधानसभेच्या निवडणुकीआधी मला बँकेसंदर्भा

Solapur : हुलजंतीत गुरू- शिष्यांच्या पालखी भेट सोहळा उत्साहात… (Video)
सोलापूर:तलाठयाच्या झिरोला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले
solapur:सोलापूर डेपो चालकाला विनाकारण मारहाण (Video)

सोलापूर :- प्रतिनिधी

शरद पवारांनी त्यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) पाठवलेल्या नोटिसीची आठवण सांगितली. ‘विधानसभेच्या निवडणुकीआधी मला बँकेसंदर्भात ईडीची नोटीस आली होती. 

मी त्या बँकेचा सभासदही नव्हतो, ना त्या बँकेकडून कधी कर्ज घेतलं होते ! त्यानंतर काय झालं, ते सगळ्यांनी पाहिले. मला ईडीची नोटीस दिली आणि संबंध महाराष्ट्राने भाजपाला येडी ठरवल’.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य्या निकटवर्तीयांवर काल आयकर विभागाच्या पथकांनी धाडी टाकल्यात. त्यात, अजित पवारांच्या बहिणीच्या कार्यालयांचाही समावेश आहे. 

यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सोलापुरात तुफान ‘बॅटिंग’ केली. म्हणालेत ‘काल अजित पवारांच्या घरी पाहुणे येऊन गेले. पण, या पाहुण्यांची आम्हाला अजिबात चिंता वाटत नाही.’

भाजपा सत्तेचा गैरवापर करते आहे, असा आरोप पवारांनी केला. देशातील जनता हे सगळे पाहते आहे. जनताच भाजपाला धडा शिकवेल. रेल्वे, विमानतळ, वाहतूक व्यवस्थेचे खासगीकरण करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. 

स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी पायाभूत सुविधा उभारल्या; पण मोदी सरकारला रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्यात अधिक रस आहे, अशी टीका पवारांनी केली.

COMMENTS