मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चाची हाक; महाराष्ट्र पेटवू शकतो, पण आमची संयमाची भूमिका – संभाजीराजे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चाची हाक; महाराष्ट्र पेटवू शकतो, पण आमची संयमाची भूमिका – संभाजीराजे

पुणे/विशेष प्रतिनिधी - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे पुन्हा आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले असून, मराठा आरक्षणासाठी दोन मिनिटात महाराष्

तरुणांनी गांधीजींच्या विचाराने भारताच्या समृध्द प्रगतीसाठी योगदान द्यावे – श्री.थानेदार  
हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईला अटक
संजय राऊत यांना मध्यवर्ती निवडणुका लागण्याचे स्वप्न पडले 

पुणे/विशेष प्रतिनिधी – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे पुन्हा आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले असून, मराठा आरक्षणासाठी दोन मिनिटात महाराष्ट्र पेटवू शकतो, पण आमची भूमिका संयमांची असल्यामुळे आता पुढे मूक मोर्चा काढणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली आहे.
सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्ही आरक्षणात काहीही करू शकणार नाही. ज्या लोकांना समाजाबद्दल काही माहिती आहे असे लोक सदस्य पाहिजेत, अशी मागणी संभाजीराजेंनी केली. माझी बाजू मांडण्याची भूमिका मी घेत आहे, आरक्षण अनेक दिवस चालेल पण आपल्या मागण्याच काय?, असा प्रश्‍न संभाजीराजेंनी उपस्थित केला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्यांसोबत 22 मागण्यांसाठी बैठक झाली, मात्र अजून यात काहीच केले नाही. आता सरकारने वसतिगृह बाबत जीआर काढून दाखवावा, आता दोन महिने झालेत, असेही संभाजीराजे म्हणाले.
आता पुढच मूक आंदोलन 20 ऑगस्ट रोजी नांदेड येथे होणार असल्याचे संभाजीराजेंनी पुण्यामधील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये म्हटले आहे. इतकच नाही तर संभाजीराजेंनी जुलै महिन्यात कोल्हापूरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांची भेटी घेतल्यानंतर तर्कवितर्क लढवणार्‍यांनाही आपल्या भाषणामधून चांगलाच टोला लगावला आहे. तसेच या भाषणात बोलताना त्यांनी आपण ही लढाई संयमाने लढत असल्याचं अधोरेखित केले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यात 58 मूक मोर्चे शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आले. तरीही सरकारला जाग येत नाही. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य कायदेशीर बाजू मांडावी. राज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी पंजाबराव देशमुख वसतिगृह सुरू करावेत, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची नेमणूक करून निधी उपलब्ध करून द्यावा, ’सारथी’ साठी एक हजार कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशा प्रमुख मागण्या या वेळी करण्यात आल्या. या मेळाव्यास छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, डॉ. बुधाजीराव मुळीक, प्रा. एम. एम. तांबे, श्रीराम पिंगळे, रघुनाथ चित्रे पाटील, धनंजय जाधव, राजेंद्र कुंजीर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
नांदेड येथे 20 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी मूक आंदोलन होणार आहे. तर, औरंगाबाद येथे 19 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आझाद मैदानावर उपोषणाची तयारी
मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी अनेक आंदोलने करूनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. त्यामुळे मुंबईत आझाद मैदानावर उपोषण करण्याचा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला. मी बहुजन समाजाचे नेतृत्व करीत आहे. छत्रपती शाहूंचा वारसा असल्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांबाबत कधीही ’मॅनेज’ होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. माझी एकट्याची आझाद मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषणास करण्याची माझी तयारी आहे. तुम्हीच ठरवा आणि सांगा, असे संभाजीराजेंनी या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना आणि कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

COMMENTS