मयत तरुणांच्या कुटुंबाला आठ लाखाची मदत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मयत तरुणांच्या कुटुंबाला आठ लाखाची मदत

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी            राहुरी शहरातील गणपती घाट येथे ५ ऑक्टोबर २०२१ रोजी  मुळा

आ. तनपुरे यांच्या प्रयत्नातून 21 नवीन रोहित्रे बसविणार
महागाई रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ः आ. तनपुरे
राहुरी बस स्थानकाच्या इमारतीचा प्रश्‍न तात्काळ सोडवा

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी 

          राहुरी शहरातील गणपती घाट येथे ५ ऑक्टोबर २०२१ रोजी  मुळा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेली  मुले पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. अमर चंद्रकांत पगारे (वय १५ वर्ष) व सुमित चंद्रकांत पगारे (वय १२ वर्ष) या दोघांचे निधन झाले.त्याच्या वारसाला आपत्ती व्यवस्थापन मधुन प्रत्येकी चार लाखाची मदतीचा धनादेश ना.राज्यमंञी प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थित तहसिलदार एफ.आर.शेख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या घटनेने पगारे कुटुंबावर मोठी आपत्ती कोसळली. कुटुंबावर सावरण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्य राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रयत्न केले. त्या मुलांची आई भाग्यश्री चंद्रकांत पगारे हिस तहसीलदार यांच्या हस्ते प्रत्येकी ४ लाख असे एकूण ८ लाखाचा धनादेश राज्यमंत्री तनपुरे, नगराध्यक्ष अनिल कासार व गजानन सातभाई यांच्या उपस्थित देण्यात आला.

यावेळी राज्यमंत्री तनपुरे यांनी त्या महिलेची भेट घेऊन सर्व व्यथा ऐकून घेतली. महिलेचा पती कुटुंबाला सोडून निघून गेल्याने सदर महिलेचा संसार उघड्यावर पडला आहे. महिलेस एक मोठी मुलगी असून ती दहावी उत्तीर्ण आहे. तिची पुढील शिक्षणाची सोय मंत्री तनपुरे यांनी करण्याचे आश्वासन यावेळी दिले असून मिळालेल्या रकमेचा पुढील काळासाठी योग्य विनियोग करण्याचे राज्यमंत्री तनपुरे व तहसीलदार शेख यांनी सूचना केली. सदर मदत मिळवून देण्यासाठी राज्यमंत्री तनपुरे यांचे कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष आघाव, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष पांडू उदावंत, प्रसाद पवार, काशिनाथ रणसिंग, राजेंद्र रणसिंग आदि उपस्थित होते.

COMMENTS