मनसेने सत्तेसाठी कधीही शिवसेनेसारखी लाचारी पत्करली नाही… आमदार राजू पाटील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनसेने सत्तेसाठी कधीही शिवसेनेसारखी लाचारी पत्करली नाही… आमदार राजू पाटील

प्रतिनिधी : मुंबई केडीएमसी निवडणूक आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशन’तर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्र

दुष्काळग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू करा ः मनसे
मनसेचं खळ्ळखट्याक… ठाण्यात टोलनाका फोडला…
राणेंच्या अटकेचे आदेश काढणारे पोलीस अधिकारी गेले राज ठाकरेंच्या भेटीला… म्हणाले…

प्रतिनिधी : मुंबई

केडीएमसी निवडणूक आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशन’तर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात मनसेचे आमदार राजू पाटील बोलत होते. 

यावेळी राजू पाटील यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. शिवसेनेने कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. 

याउलट येथील जनता आता शिवसेनेच्या भावनिक खेळाच्या राजकारणाला कंटाळली आहे. हे पाहता आगामी केडीएमसी निवडणुकीत मनसे निर्णायक स्थितीत असेल , असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना आणि भाजपकडून एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत . मात्र या दोन्ही पक्षांमध्ये विरोधाच्या राजकारणावर आपला अजिबात विश्वास नाही. 

ते कधीही एकमेकांना डोळा मारतील त्यामूळे त्यांचे राजकारण त्यांनाच लखलाभ असो ,असे वक्तव्य मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केल्याने राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

मनसेने सत्तेसाठी कधीही शिवसेनेसारखी लाचारी पत्करली नाही. आम्हाला राज साहेबांच्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार समजतात. 

त्यातून आपण एकच म्हणू शकतो की सत्तेसाठी त्यांनी इतकी खालची पायरी गाठायला नको होती, असे म्हणत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. 

मागील निवडणुकीत सत्ताधा-यांनी जी आश्वासने दिली होती त्याचा जाब आता आगामी निवडणुकीत विचारणार असल्याचे ते म्हणाले. यात सर्वसामान्य जनतेची प्रश्न आणि रस्त्यावरचे खड्डे यासारखे मुद्दे असतील.

COMMENTS