भारतीय वंशाचे सत्या नाडेला मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतीय वंशाचे सत्या नाडेला मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष

जगातील सर्वांत मोठ्या सॉफ्टवेअर निर्मात्या मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने भारतीय वंशाच्या सत्या नाडेला यांची कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

व्यावसायिक एलपीजी सिलेंडर’ 266 रुपयांनी महागले
त्या शिवलिंगाचे होणार कार्बन डेटिंग
मुंबई फिल्म सिटी मध्ये इमली मालिकेच्या सेट वर कामगाराचा शॉक लागून मृत्यू

नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठ्या सॉफ्टवेअर निर्मात्या मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने भारतीय वंशाच्या सत्या नाडेला यांची कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याआधी नाडेला यांनी गेली ७ वर्षे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पद भूषविले आहे. दरम्यान कंपनीचे माजी अध्यक्ष जॉन थॉम्पसन यांची प्रमुख स्वतंत्र संचालक पदी (लीड इंडिपेंडंट डायरेक्टर) नियुक्ती केल्याचेही कंपनीने जाहीर केले आहे. 

२०१४ मध्येच जॉन थॉम्पसन यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्याकडून कंपनीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. तसेच स्टीव्ह बामर यांच्यानंतर ५३ वर्षीय नाडेला २०१४ पासून मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. नाडेला यांची या पदावर एकमताने नियुक्ती झाली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, नाडेला यांचे व्यवसायाबद्दलचे सखोल ज्ञान योग्य धोरणात्मक संधी स्वीकारण्यासाठी आणि महत्त्वाच्या जोखीम ओळखण्यासाठी कंपनीला उपयोग होईल.

नाडेला यांची सीईओ पदाची कारकिर्द

नाडेला यांच्या सीईओ पदाच्या कारकिर्दीत मायक्रोसॉफ्ट कंपनीची मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वृद्धी झाली. लिंक्डइन, नुआन्स कम्युनिकेशन्स, झेनीमॅक्स यांसारख्या कंपन्या अब्जावधी डॉलर्संना मायक्रोसॉफ्टने विकत घेतल्या. त्याची दखल घेऊन नाडेला यांना अध्यक्षपदी बढती देण्यात आली असल्याची चर्चा आहे. १९७५ मध्ये स्थापन झालेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीला नवी उर्जा देण्याचे काम नाडेला यांनी केले. २०१४ मध्ये नाडेला सीईओ झाले. त्या वेळी ॲपल आणि गुगल या स्पर्धक कंपन्यांनी मोबाईलवर लक्ष केंद्रित करून आघाडी घेतली होती. त्या स्पर्धेत कंपनीला आणण्याचे काम नाडेला यांनी केले.

COMMENTS