शिक्रापूर / प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीकडून निष्ठावंतांना डावलून उमेदवारी देण्याचे काम सुरु असून उमेदवारीच्या अर्जाच्या निमित्ताने सध्या राज

शिक्रापूर / प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीकडून निष्ठावंतांना डावलून उमेदवारी देण्याचे काम सुरु असून उमेदवारीच्या अर्जाच्या निमित्ताने सध्या राजकरणाची हास्य जत्रा सुरु आहे. यामुळे भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर आहे आणि याची पहिली लक्षणे या निवडणूकच्या निमित्ताने दिसत असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे.
कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथे 208 व्या शौर्यदिनाच्या निमित्ताने विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे उपस्थित होत्या. यावेळी बोलताना दरवर्षी नवीन वर्षाची सुरुवात विजयस्तंभाला अभिवादन करुन आम्ही करत असतो. येथील शूरवीरांना व त्यांच्या शौर्याला अभिवादन करुन वर्षभरातील नवीन आव्हानांना सामोरे जाण्याचे बळ लाभो हि त्यामागील भावना असते. असे सांगत पुढे बोलताना ज्या भाजपा सोबत अजित दादांनी घरोबा केलेला आहे. त्या भाजपामध्ये बलत्कारी, तडीपार, भ्रष्टाचारी सर्व प्रकारचे गुन्हेगार आहेत. भाजपा सोबत असेल तर आपण गुन्हेगारांना देखील निवडून आणू शकतो. कारण साम, दाम, दंड, ईव्हीएम सर्व यंत्रणा आपल्या हातात असल्याची खात्री मिळाल्यामुळे जनतेच्या मताची गरज नाही, असे गृहीत धरून आम्ही काहीही करुन निवडून येऊ शकतो. असे मानून जनतेच्या मताचा आदर न करता राजकारणाची गुन्हेगारी करण करण्याचा प्रयत्न निषेधार्थ आहे. तसेच आम्ही आमदार-खासदारांच्या मुलाला उमदेवारी देणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी संगितले होते. मात्र, पुण्यात बापूसाहेब पठारे यांच्या मुलासह सुनेला उमेदवारी देऊन निष्ठावंतांची ठट्टा असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच भाजपाची भूक इतकी मोठ्ठी आहे कि भाजपाने इतक्या लोकांना पक्षात घेतले इतल्या लोकांना पक्षात घेतले कि, घरात जागा देण्यासाठी ज्यांनी घर बांधले त्यांना घरातून बाहेर काढण्याची वेळ भाजपावर आली असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री, गृहमंत्री हेच गुन्हेगारांना अभय देण्यासाठी सरसावले असतील तर गुन्हेगारीबद्दल पोलिसांना नावे ठेऊन उपयोग नसल्याचे देखील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले.

COMMENTS