Homeताज्या बातम्यादेश

भारताच्या लष्करी सामर्थ्यासह सांस्कृतिक विविधेचे दर्शन

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबिआंत यांच्यासह विविध क्षेत्रातील

बळीराजा आंदोलनावर ठाम
वय १२ वर्ष आणि कमावतोय २ कोटी
वाहनांच्या नूतनीकरणासाठी विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबिआंत यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. दिल्लीच्या कर्तव्यपथावरुन पथसंचलनालयाला सुरुवात झाली. यामध्ये भारताच्या लष्करी सामर्थ्यासह सांस्कृतिक विविधतेचे नेत्रदीपक प्रदर्शन ’याचि देहि याचि डोळा’ अनुभवले. यानिमित्ताने इंडोनेशियाचे जवानही पथसंचलनात सहभागी झाले होते.
भारताने सोमवारी 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. या दिवसाला खास बनवण्यासाठी कर्तव्य पथावर आयोजित केलेल्या भव्य परेडने देशवासियांना अभिमानाने आणि उत्साहाने भारून टाकले. यावेळी प्रजासत्ताक दिनाची थीम ’सुवर्ण भारत : वारसा आणि विकास’ अशी होती. यंदा प्रजासत्ताक दिनासोबतच भारतीय राज्यघटना लागू झाल्याचा 75 वा वर्धापन दिनही साजरा केला जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सुरुवात केली. राष्ट्रपती मुर्मू यांनी तिसर्‍यांदा राजपथावर तिरंगा फडकवला. यावेळी राष्ट्रध्वजाला 21 तोफांची सलामी देण्यात आली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्ध स्मारकावर पोहोचून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतला. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्यासोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बग्गीत बसून कर्तव्य पथावर आल्या. परेडची सुरुवात संस्कृती मंत्रालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. 300 कलाकारांनी वाद्य वाजवत परेडची सुरुवात केली. त्यानंतर इंडोनेशियन लष्करी जवानांची तुकडी कर्तव्य पथावर संचलन केले.

COMMENTS