नगर- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्य कुशलतेने जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे. कोरोना महामारी च्या काळात जगातील अनेक देशांना औषध
नगर-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्य कुशलतेने जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे. कोरोना महामारी च्या काळात जगातील अनेक देशांना औषध पुरवठा करून भारताने मानवतेचा संदेश दिला आहे.तसेच मोदीजींच्या प्रयत्नामुळेच भारतीय योगाला जागतिक महत्त्व प्राप्त होऊन 21 जून 2015 रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो.तसेच कोरोना काळात भारतीय संस्कृतीचा हेवा जगाला वाटत आहे.दुरूनच नमस्कार करण्याची पद्धत तसेच घरात येताना अंगणात हात-पाय स्वच्छ धुणे या सर्व गोष्टींमुळे भारतीय संस्कृतीचे महत्त्व जगाला पटले आहे. पंतप्रधान नरेंद्र जी मोदी हे यशस्वी पंतप्रधान असल्याने भारताची वाटचाल महासत्तेकडे मोठ्या दिमाखाने होत आहे.असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी केले.
तेलीखुंट येथील संताजी चौक येथे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रांतिक तैलिक संघटनेच्यावतीने लाडू वाटप करण्यात आले.याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव बोलत होते.याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,कोषाध्यक्ष मुकुल गंधे,महाराष्ट्र प्रांतिक संघटनेचे नाशिक विभागाचे कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे,महानगर सचिव विजयराव दळवी,कृष्णकांत साळुंखे,सहसचिव चंद्रकांत लोखंडे,शहर उपाध्यक्ष सचिन म्हस्के,कार्याध्यक्ष कृष्णकांत साळुंके,परसराम सैंदर,माधव ढवळे,विक्रम शिंदे,गणेश हजारे,उमेश काळे,गणेश म्हस्के,अनील देवराव,गणेश धारक,सुरेश देवकर,राहुल म्हस्के,सचिन वाकचौरे,राहुल काळे,राजू म्हस्के,सतिष म्हस्के,प्रकाश जुदंरे,तुषार रामदासी,महेश निकम,रविद्र म्हस्के,महेश आहेर आदिंसह तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी विजय दळवी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,आधुनिक काळातील मोदीजी हे श्रीकृष्ण च आहेत.तेजस्विता तपस्वीता व तत्परता या त्रिवेणी सद्गुणांचा संगम त्याचे ठायी असल्याने निर्णायक भूमिका सहज घेऊ शकतात.
कृष्णकांत साळुंके म्हणाले की,थोर देशभक्त व जागतिक नेतृत्व अशी ओळख मोदींची झाली आहे.
हरीभाऊ डोळसे म्हणाले की,भारत देश महान आहे.नरेंद्रजी मोदी हे देशातील लोकप्रिय पंतप्रधान आहेत.तेली समाजाची शान आहे.सर्व तेली समाज बांधवांना नरेंद्रजी मोदी यांचा अभिमान आहे.त्यांचा वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक संघटनेच्या वतीने व नगर शहरातील तेली समाज बांधवांच्या वतीने नगर येथे साजरा केला जातो.असे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयराव दळवी यांनी केले तर आभार चंद्रकांत लोखंडे यांनी मानले.
COMMENTS