भाजपचा आमदार फुटला… ‘या’ पक्षात केला प्रवेश

Homeताज्या बातम्यादेश

भाजपचा आमदार फुटला… ‘या’ पक्षात केला प्रवेश

वेब टीम : कोलकता पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये भाजपाला सातत्याने एकामागोमाग एक झटके बसत आहेत.  भाजपामधील आऊटगोईंग अजून

चंद्रकांतदादांच्या मनातली खदखद
भाजप मधल्या ही त्या नेत्यांची इडीने माहिती जाहीर करावी (Video)
Nanded : कोणी सोडून गेल्याने भाजपाला फरक पडत नाही (Video)

वेब टीम : कोलकता

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये भाजपाला सातत्याने एकामागोमाग एक झटके बसत आहेत. 

भाजपामधील आऊटगोईंग अजूनही सुरूच आहे. आमदार, खासदारांसह अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला रामराम ठोकला आहे. 

रायगंज येथील भाजपाचे आमदार कृष्णा कल्याणी यांनी बुधवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी तृणमूलचे महासचिव पार्थ चॅटर्जी आणि आमदार विवेक गुप्ता उपस्थित होते.

कृष्णा कल्याणी यांनी माहिन्याच्या सुरुवातीला भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्याआधी भाजपाने त्यांना पक्षाचे खासदार देबश्री चौधरी यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी नोटीस बजावली होती. 

भाजपातील पदांचा राजीनामा दिल्यानंतर कल्याणी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. अखेर त्यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. 

त्यानंतर त्यांनी थेट पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. आज तृणमूलचे महासचिव पार्थ चॅटर्जी आणि आमदार विवेक गुप्ता उपस्थितीत कल्याणी यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला.

COMMENTS