बोरगाव येथे डॉ. इंद्रजित मोहिते यांची पदयात्रा

Homeमहाराष्ट्र

बोरगाव येथे डॉ. इंद्रजित मोहिते यांची पदयात्रा

मी चेअरमन असताना कारखान्यावर सात प्रकल्प उभा करून इतर कारखान्यांपेक्षा काकणभर जादा दर दिला. 2010 नंतर शिल्लक राहिलेल्या नफ्यावर पहिले दोन वर्षे दर काढता आला.

राहुरी कृषि विद्यापीठाच्या तीन पुस्तकांचे दिल्लीच्या कार्यक्रमात विमोचन
Ahmednagar : आमदार मोनिका राजळेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात | LOKNews24
संस्थाचालकांनी बनावट दस्तऐवज करून दिल्या नोकर्‍या ?

इस्लामपूर / प्रतिनिधी : मी चेअरमन असताना कारखान्यावर सात प्रकल्प उभा करून इतर कारखान्यांपेक्षा काकणभर जादा दर दिला. 2010 नंतर शिल्लक राहिलेल्या नफ्यावर पहिले दोन वर्षे दर काढता आला. तर विद्यमान संचालक मंडळाने सहा वर्षात आठ ते नऊ बिले चुकवली. असे असताना सत्ताधारी सर्व गोष्टीत विक्रम व उच्चांक केल्याचा डांगोरा पिटत आहेत. मग त्यांना यावर्षीची एफआरपी देताना अडचण का आली आहे. याचा अर्थ सर्व उच्चांकी मग ऊस दर देण्यास कारखान्याला काय कोरोना झाला आहे का? असा सवाल डॉ. इंद्रजित मोहिते यांनी उपस्थित केला.

बोरगाव (ता. वाळवा) येथे यशवंतराव मोहिते रयत पॅनेलच्या प्रचारार्थ डॉ. मोहिते यांनी रेठरे हरणाक्ष-बोरगाव गटातील उमेदवार विश्‍वासराव मोरे, विवेकानंद मोरे, प्रा. अनिल पाटील, बोरगावचे माजी उपसरपंच विकास पाटील, विलास शिंदे, विश्‍वास पाटील व पदाधिकारी यांच्यासमवेत पदयात्रा काढली. यावेळी ते बोलत होते. 

कारखान्याची निवडणूक हा शेतकर्‍याचा आणि सभासदांचा प्रश्‍न आहे. तो राजकीय व पक्षीय आखाडा नाही, असे सांगून डॉ. मोहिते म्हणाले, कारखान्याचे व्यवस्थापन ज्या ज्यावेळेस यशवंतराव मोहिते भाऊंच्या विचाराने चालले. त्या त्यावेळी सभासदांना सन्मानाची वागणूक व त्यांना जास्तीत जास्त दर मिळाला. सत्ता व सुविधांचे विकेंद्रीकरण झाले. मी चेअरमन असताना भाऊंच्या विचारामुळे सुवर्ण दिवस पहायला मिळाले. आमच्या कारभारात सात प्रकल्प उभे राहिले. सभासदांना दर जादा मिळाला. त्यामुळे राहणीमान उंचावले. पण गेल्या अकरा वर्षात सभासदांना ऊस बिले किती मिळाली. हे तपासून पहा. मी पाच वर्षात 24 बिले दिली. सभासदांनी मागील बिले काढून तपासावीत. व ऊसदराचा खरा इतिहास जाणून घ्यावा. अविनाश मोहिते व सुरेश भोसले यांनी नऊ ते दहा बिले चुकवली. इतर कारखान्यांपेक्षा दरही कमी दिला आहे.

COMMENTS