बोठे आता खंडणीच्या गुन्ह्यात वर्ग ; तोफखाना पोलिसांनी घेतले ताब्यात, आज न्यायालयात नेणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोठे आता खंडणीच्या गुन्ह्यात वर्ग ; तोफखाना पोलिसांनी घेतले ताब्यात, आज न्यायालयात नेणार

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार सकाळचा कार्यकारी संपादक व पत्रकार बाळ बोठे याला आधी हत्याकांड प्रकरणी अटक केल्यानंतर कोतवालीत दाखल असलेल्या विनयभंग प्रकरणात वर्ग केले गेले आणि आता खंडणीचा गुन्ह्यात बोठेला शनिवारी तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले.

जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायती व 15 सरपंच झाले बिनविरोध
कोपर्डीतील ग्रामपंचायतच्या गाळ्यांवरील पत्रे उडाले
तुमचे आजचे राशीचक्र शनिवार, ०५ जून २०२१ l पहा LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार सकाळचा कार्यकारी संपादक व पत्रकार बाळ बोठे याला आधी हत्याकांड प्रकरणी अटक केल्यानंतर कोतवालीत दाखल असलेल्या विनयभंग प्रकरणात वर्ग केले गेले आणि आता खंडणीचा गुन्ह्यात बोठेला शनिवारी तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असणार्‍या बाळ बोठेला पोलिसांच्या पथकाने हैदराबाद येथून मोठ्या शिताफीने पकडल्यानंतर त्याला पारनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते.

 न्यायालयाने त्याला दोनदा पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर बोठे याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर महिला लैंगिक अत्याचार व विनयभंगप्रकरणी बोठे याला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतल होते. यानंतर त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी बोठे याला पुन्हा नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली मात्र, तोफखाना पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा मंगल भुजबळ यांनी दाखल केला असल्याने याप्रकरणात बोठे याला ताब्यात घेण्यासाठी तोफखाना पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यामुळे बोठे याला तोफखाना पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

आदेशाची प्रतीक्षा

बोठे याने अनेक प्रकरणे उघडकीस आणले होते. यातील बहुतांशी आरोपी हे नगरच्या सबजेल व पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे आपणास या ठिकाणी ठेवल्यास आपल्या जीवितास धोका असल्याने नाशिक कारागृहात ठेवावे, अशी लेखी मागणी आरोपी बोठे याच्यावतीने वकील संकेत ठाणगे यांनी पारनेर न्यायालयात केली होती. या मागणीवर अद्याप निर्णय न झाल्याने बोठे याला कोणत्या कारागृहात ठेवणार, याबाबत अद्याप संभ्रम आहे. दरम्यान, रविवारी तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या खंडणीचा गुन्ह्यामध्ये बोठे याला न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे. तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये भुजबळ यांनी जो खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे, त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी भागवत दहिफळे यांचासुद्धा समावेश आहे. पण दहिफळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. रेखा जरे खून प्रकरणामध्ये मुख्य आरोपी बोठे याला आता नगर शहरातील कोतवाली व तोफखाना पोलिसांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये वर्ग केल्यामुळे आता पोलिसांनी त्या दृष्टिकोनातून तपासही सुरू केला आहे तसेच बोठे याचा हस्तगत केलेला आयफोन हा फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला आहे. त्यामध्ये सुद्धा आता अनेक बाबी उजेडात येण्याची दाट शक्यता आहे.

COMMENTS