बोठेला पकडणार्‍या हैदराबादकरांचा गौरव ;  नगरच्या पोलिसांनी दिले प्रशंसापत्र

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोठेला पकडणार्‍या हैदराबादकरांचा गौरव ; नगरच्या पोलिसांनी दिले प्रशंसापत्र

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी व दैनिक सकाळचा कार्यकारी संपादक बाळ ज.

मराठी भाषाशुद्धीचे प्रथम प्रवर्तक छत्रपती शिवराय – डॉ. बाबुराव उपाध्ये
सतराशे किलोचे गोमांस पोलिसांनी केले जप्त
कर्जाचा विनीयोग योग्य कामासाठी करा ः कोल्हे

अहमदनगर/प्रतिनिधी : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी व दैनिक सकाळचा कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे याला हैदराबाद येथे जेरबंद करण्यात मोलाची कामगिरी बजावणार्‍या हैदराबाद पोलिसांचा प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आला. नगरचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी हे प्रशंसापत्र हैदराबादच्या पोलिसांना दिले आहे.

याबाबतची माहिती अशी की, रेखा जरे यांच्या हत्येबाबत पारनेर तालुक्यातील सुपा पोलिसात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी बाळ जगन्नाथ बोठे (रा. प्रेमदान चौक, अहमदनगर) हा गुन्हा घडल्यापासून फरार झालेला होता. आरोपी बाळ बोठे हा (हैद्राबाद, राज्य तेलंगना) येथे लपून बसला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने नगर पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्हा पोलिसांची वेगवेगळी पथके आरोपी बोठेेचा शोध घेण्यासाठी हैद्राबाद येथे पाठविण्यात आली होती. आरोपी लपून बसलेले ठिकाण हे दाट व संवेदनशील लोकवस्तीचे असल्यामुळे या ठिकाणी आरोपीचा शोध घेणे कठीण होते. अशा परिस्थितीत आरोपीचा शोध घेण्यासाठी हैद्राबाद पोलिस दलातील वुमन सेफ्टी व अ‍ॅनालिसीस विंग यांची मदत घेण्यात आली होती. त्या पथकामधील पोलिस निरीक्षक आर. रवीन्द्र, पोलिस उपनिरीक्षक पी. हरिष तसेच पोलीस कर्मचारी यु . रवि, एम . मधू, जी. रविकुमार, के. आर. संध्यारेखा, के. सुनीता, चि. सैदुलू या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपीला पकडण्यासाठी योग्य ती मदत करुन आरोपी बोठेे यास पकडून देण्यास मदत केली होती. या कामगिरीबद्दल श्रीमती स्वाती लाकरा (अपर पोलीस महासंचालक, हैद्राबाद) व श्रीमती सुमती (पोलीस उप निरीक्षक, हैद्राबाद) यांनी तपासामध्ये मदत करणारे हैद्राबाद पोलिस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा विशेष सत्कार करुन अभिनंदन केले आहे. तसेच या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता गुन्ह्यातील मुख्य आरोपीस अटक झाल्यामुळे हैद्राबाद येथील वरील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनीही प्रशंसापत्रक देवून विशेष कौतुक केले आहे.

COMMENTS