बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडून मलिकांनी घेतली कोट्यवधींची जमीन : फडणवीस यांचे आरोप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडून मलिकांनी घेतली कोट्यवधींची जमीन : फडणवीस यांचे आरोप

मुंबई : मुंबईत 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनी साडेतीन कोटी रुपयांच

कशी वाचवणार महिलांची इभ्रत ?
आमच्या जीविताशी खेळू नका… शिक्षक परिषद व शिक्षक संघाची सरकारला आर्त विनवणी, आधी लसीकरण करण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबुत करण्यासाठी तालुका, शहराध्यक्षाची निवड लवकरच -हरिहर भोसीकर

मुंबई : मुंबईत 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनी साडेतीन कोटी रुपयांची जमीन केवळ 20 लाख रुपयांना विकत घेतल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. यासंदर्भात माहिती देताना फडणवीस म्हणाले की, सरदार शहावली खान हा 1993 च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आहे. सध्या तो कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे. टायगर मेमनच्या नेतृत्वात तो फायरिंगच्या ट्रेनिंगमध्ये सहभागागी झाला होता. बीएसई आणि पालिकेमध्ये बॉम्ब कुठे ठेवायचे, याची रेकी त्यानी केली होती. टायगर मेमनच्या घरी बॉम्ब ब्लास्टच्या कारस्थान मांडणीवेळी तो उपस्थित होता. टायगर मेमनच्या घरी गाड्यांमध्ये त्यानेच आरडीएक्स भरले. साक्षीदारांनी याविषयी साक्ष दिल्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
मोहम्मद अली इशाक पटेल उर्फ सलीम पटेल. आर. आर. पाटील इफ्तार पार्टीमध्ये गेले होते तेव्हा त्यांची गुन्हेगारासोबत फोटो व्हायरल झाला होता. त्यांचा दोष काही नव्हता. पण ज्या दाऊदच्या माणसासोबत म्हणून त्यांचा फोटो व्हायरल झाला, तो हा सलीम पटेल. तो हसीना पारकरचा बॉडीगार्ड, ड्रायव्हर, फ्रंटमॅनही होता. हसीना पारकरला 2007 मध्ये अटक झाली, तेव्हा सलीम पटेललाही अटक झाली. दाऊदनंतर हसीना पारकरच्या नावाने संपत्ती गोळा केली जायची. सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी करून पैसा गोळा केला जायचा. हा सलीम पटेल जमीन लाटण्याच्या धंद्यातला सर्वात प्रमुख माणूस होता.
कुर्ल्यामध्ये 2.80 एकर म्हणजेच 1 लाख 23 हजार स्क्वेअर फूटची जागा जिला गोवावाला कंपाऊंड असे म्हटले जाते. कुर्ल्यात एलबीएस रस्त्यावर ही जागा आहे. या जमिनीची एक रजिस्ट्री सॉलिडस नावाच्या कंपनीसोबत झाली. मरियमबाई गोवावाला, मुदीरा प्लंबर या दोघांकडून सलीम पटेल हे पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर आहे. विक्री करणारा सरदार शहावली खान आहे. म्हणजे या दोघांनी मिळून या जमिनीची विक्री सॉलिडस कंपनीला केली. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची आहे. घेणाऱ्याची सही फराज मलिक नावाच्या व्यक्तीची आहे. या सॉलिडसमध्ये 2019 मध्ये खुद्द नवाब मलिक देखील होते. आजही त्यांच्या कुटुंबाचे लोक त्यात आहेत. कुर्ल्याच्या फोनिक्स मार्केटच्या जमिनीवेळीच एलबीएस रोडवरची ही जमीन रेडीरेकनर रेट 8500 आणि मार्केट रेट 2053 रुपये प्रती चौरस फूट दराने घेतली गेली. ही जमीन 30 लाखात खरेदी केली गेली. त्यातही 15 लाख रुपयांचे पेमेंट हे मालकाला न मिळता त्यांचा पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर सलीम पटेलच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर 10 लाख रुपये शहावली खान ज्याला सरदार खान म्हणतात, त्याला मिळाले. त्यातही 5 लाख नंतर मिळतील असे लिहिले. म्हणजे वीस लाखात एलबीएस रोडवर 3 एकरच्या जमिनीचा व्यवहार झाला. हा सौदा झाला 2003 मध्ये झाला तेव्हा नवाब मलिक मंत्री होते. अंतिम रजिस्ट्री झाली त्याच्या काही दिवस आधी नवाब मलिक यांना पद सोडावे लागले. पण तुम्हाला माहिती नव्हते की सलीम पटेल कोण आहे ? मुंबईच्या गुन्हेगारांकडून तुम्ही जमीन खरेदी का केली ? मुंबईत बॉम्बब्लास्ट करणाऱ्यांकडून तुम्ही जमीन का खरेदी केली ? अशा कोणत्या कारणामुळे त्यांनी एलबीएसमधली 3 एकरची जमीन इतक्या स्वस्तात दिली. या आरोपींवर टाडा लागला होता. टाडाच्या कायद्यानुसार आरोपीची सगळी मालमत्ता सरकार जप्त करते. मग टाडाच्या आरोपीची जमीन जप्त होऊ नये, यासाठी तुम्हाला ट्रान्सफर केली गेली का ? अशी प्रश्नांची सरबत्तीच फडणवीस यांनी केली.

COMMENTS