बेसुमार पाणी वापरणाऱ्यांनी किमान दहा पट तरी पाणी पट्टी भरावी : वाहडणे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेसुमार पाणी वापरणाऱ्यांनी किमान दहा पट तरी पाणी पट्टी भरावी : वाहडणे

नगरपरिषदेतील सत्तेचा गैरवापर करून प्रचंड पाणी वापरणारेच विचारतात कि पाणी का कमी पडते.

दूध दरावर मंत्रालय स्तरीय बैठकीत तोडगा काढण्यात अपयश
बेलापूर गावात डास प्रतिबंधक फवारणीस सुरुवात
श्रीगोंद्यात शंकर व वात्सल्य मूर्तीची प्रतिष्ठापना

कोपरगाव शहर प्रतिनिधी : नगरपरिषदेतील सत्तेचा गैरवापर करून प्रचंड पाणी वापरणारेच विचारतात कि पाणी का कमी पडते. थोडीफार नैतिकता असेल तर बेसुमार पाणी वापरणाऱ्यानी किमान १० पट तरी पाणीपट्टी भरली पाहिजे असे आवाहन नगराध्यक्ष विजय वाहडणे यांनी बेसुमार २४-२४ तास पाणी वापरनाऱ्या व सत्तेचा गैरवापर करत अधिकाऱ्यांन वर दबाव टाकणाऱ्याची नावे जाहीर केली आहे.मुख्य पाण्याचा  लाईनवर २४ तास पाणी वापरणारे,समता पतसंस्था,विजयकुमार प्रेमराज काले, एस. टी. डेपो, तालुका विकास मंडळ, बाळकृष्ण सारंगधर, विठ्ठल क्षत्रिय, बद्रीनाथ चावला, राजेंद्र बा.वाणी, माजी सैनिक कार्यालय, संजय बोऱ्हाडे, अरुण वाणी, कल्याण गंगवाल, के.बी.पी.विद्यालय
,शिलेदार साहेबराव, कोपरगाव वि.सो. पेट्रोल पंप, बोरावके मोटेल्स, राजेंद्र झावरे परंतु फक्त  झावरे हे एकमेव असे आहेत कि ज्यांनी दि १७ मार्च २०१२ ला स्वतःचे मेन लाईनवरील नळजोड काढून टाका असे पत्र नगरपालिकेला दिलेले आहे. तर १२ तासापेक्षा जास्त वेळ पाणी वापरणारे बाबासाहेब गाडे, शिवाजी आनंदराव संधान, राहुल रोहमारे (संधान), केशव भवर, जानकीदेवी पडियार, केशवराव साबळे, नानासाहेब  चांदगुडे तसेच २४  तास पाणी वापरत असलेले कमलिनी सातभाई वाचनालय , दिलीपराव वाघ, गुलाब अगरवाल, वायखिंडे, माधव जोशी, रविंद्र पाटील, द्वारकानाथ व्यास, विठ्ठल आदमाणे, सेवा निकेतन, होली फॅमिली चर्च ,अंबादास साळुंके, वर्धमान पांडे त्यासोबतच ८  तास पाणी वापरणारे माजी नगराध्यक्ष संजय सातभाईं सारखे अनेक जण आहेत.त्यामुळे हे  जास्त पाणी वापरणाऱ्यांचा पाणी पुरवठा येत्या काळात एक ते दिड तासांवर आणण्याचे काम प्रगतीपथावर  सुरू असून दोन महिन्यात हे पुर्ण करण्याचा प्रयत्न आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. शहरवासीयांना पाणी कुणामुळे कमी पडते हे यावरून समजू शकते.कर्मचाऱ्यांना हाताशी धरून,अधिकाऱ्यांवर दबाव आणून वर्षानुवर्षे मनमानी करणारे अजूनही भानावर नाहीत.त्यांना भानावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.शहर विकास व्हावा यासाठी नेत्यांनी अशा प्रवृत्तीना पाठिशी घालू नये अशी माहिती नगराध्यक्ष विजय वाहडणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

COMMENTS