बीडचे पालकमंत्री धनुभाऊंच्या मुजोर ठेकेदाराने पैठण-पंढरपुर राष्ट्रीय महामार्गाची वाट लावली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडचे पालकमंत्री धनुभाऊंच्या मुजोर ठेकेदाराने पैठण-पंढरपुर राष्ट्रीय महामार्गाची वाट लावली

प्रतिनिधी : बीड पाटोदा तालुक्यातील पैठण ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 या रस्त्याचे काम 2017 पासुन सुरू असून ठेकेदाराने अर्धवट काम

Beed : पाटोदा नगर पंचायतीच्या विरोधात नागरिकांचे धरणे आंदोलन (Video)
Beed : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेकापचे अर्धनग्न आंदोलन ! (Video)
बीड : लिंबागणेश येथिल आठवडी बाजारास भरघोस प्रतिसाद (Video)

प्रतिनिधी : बीड

पाटोदा तालुक्यातील पैठण ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 या रस्त्याचे काम 2017 पासुन सुरू असून ठेकेदाराने अर्धवट काम केले आहे वारंवार निवेदन, आंदोलनानंतर सुद्धा कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही. पाटोदा तालुक्यातील मौजे घुमरा पारगाव ते अनपटवाडी दरम्यान रस्त्याच्या मध्यभागी मोठ्याप्रमाणात भेगा पडल्या असून त्याठीकाणी रात्री-अपरात्री वाहनाची चाके भेगामध्ये फसुन अपघात होऊन जिवितहानी होण्याची शक्यता आहे.

त्यामुळेच या निकृष्ट रस्त्याप्रकरणात गुणनियंत्रक विभागामार्फत चौकशी करण्यात येऊन संबधित ठेकेदार व अभियंत्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येऊन निकृष्ट दर्जाचे काम करणा-या तिरूपती कन्स्ट्रक्शन परळी कंपनीचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे. व देयके देण्यात येऊ नयेत अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे यांनी केली आहे.

निकृष्ट रस्त्याप्रकरणात तिरूपती कन्स्ट्रक्शन परळीचे मालक ठेकेदार हे धनंजय मुंढे यांचे जवळचे कार्यकर्ते असल्याने व स्थानिक आमदार बाळासाहेब आजबे व आमदार. सुरेश आण्णा धस या लोकप्रतिनिधींकडून राजकीय लाभापोटीमौन साधले जात असल्याने ठेकेदाराचा मुजोरपणा वाढला असून पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते यांचे निवेदने, आंदोलने याचा फरक पडत नसल्याचे या ठेकेदारा कडून उघड बोलून दाखवले जात आहे .

COMMENTS