बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण ; राणेंनी अभिवादन केल्यानंतर गोमुत्र शिपंडत केला दुग्धाभिषेक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण ; राणेंनी अभिवादन केल्यानंतर गोमुत्र शिपंडत केला दुग्धाभिषेक

मुंबई/प्रतिनिधी : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरूवारपासून मुंबईतुन जन आशीर्वाद यात्रेला सुरूवात केली. बाळासाहेब ठाकरे आपले दैवत असून, त

राणेंनी स्वतःला महान समजणं बंद केलं तर आयुष्यातील समस्या औषधांशिवाय बऱ्या होतील l LokNews24
महाराष्ट्रातून एक कॅबिनेट व तीन राज्यमंत्री
अहमदनगरमध्ये नारायण राणेंच्या प्रतिमेचे दहनI LOK News24

मुंबई/प्रतिनिधी : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरूवारपासून मुंबईतुन जन आशीर्वाद यात्रेला सुरूवात केली. बाळासाहेब ठाकरे आपले दैवत असून, त्यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून ही यात्रा राणे यांनी सुरू केली. मात्र राणे यांनी अभिवादन केल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी या स्मृतीस्थळाला दुधाचा अभिषेक आणि गोमूत्राने शुद्धीकरण करण्यात आल्यामुळे राज्यात नवा राजकीय वाद उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राणे आणि शिवसेना यांची एकमेकांविषयी असलेली टोकाची भूमिका आणि मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी राणे यांना भाजपने पुढे करत खेळलेली राजकीय खेळी यातून भविष्यकाळात मोठा संघर्ष बघायला मिळू शकतो. बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे केअर टेकर आप्पा पाटील यांनी स्मृतीस्थळावर आधी दुग्धाभिषेक, त्यानंतर गोमूत्राने हे शुद्धीकरण करण्यात आले. त्यानंतर तिथे फुले वाहण्यात आली आहेत. दरम्यान, नारायण राणे या ठिकाणी सकाळी आले होते, त्यासाठी हे शुद्धीकरण केल्याचे सांगितले जात आहे. आप्पा पाटील यांच्यासोबत काही शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते त्यावेळी हजर होते. आज ही वास्तू अपवित्र झाली. तिथे दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केले. बाळासाहेबांची फ्रेम पाण्याने धुवून तिच्यावर दुग्धाभिषेक केला. त्यानंतर बाळासाहेबांना आवडणारी चाफ्याची फुलं तिथे वाहिली आहे. त्यांना आज शिवसेना दिसली. इतक्या वर्षात शिवसेना सोडून गेल्यानंतर त्यांना बाळासाहेब दिसले नव्हते. देशाच्या टॉप 5 मध्ये असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ते काहीही बोलत होते. आम्ही ठाकरे कुटुंबाबद्दल निष्ठा राखणारे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही हे सहन करू शकत नाही. म्हणून आम्ही हे शुद्धीकरण केले आहे. मी रोज इथे येतो, अशी प्रतिक्रिया हे शुद्धीकरण करणारे शिवसेना कार्यकर्ते आप्पा पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, नारायण राणेंना बाळासाहेब ठाकरे स्मारकावर दर्शनासाठी जाऊ देणार नाही, अशी भूमिका आधी काही शिवसैनिकांनी घेतली होती. मात्र नारायण राणेंचे विनासायास स्मारक भेट झाली. या पार्श्‍वभूमीवर नारायण राणेंनी शिवसेनेवर खोचक टीका केली. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर मी मानवंदना देण्यासाठी जाऊ नये यासाठी प्रयत्न झाले. कुणी मला अडवायला तरी आले पाहिजे. पण कुणीच आले नाही. माणसे राहिलेच नाहीयेत शिवसेनेत. झाडावर उड्या मारतात, तेवढेच उरलेत, असा टोला राणेंनी लगावला.

32 वर्षात मुंबई बकाल करून टाकली: राणे
जन आशीर्वाद यात्रेला संबोधित करतांना केंद्र्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जहरी टीका केली. हे कसले मुख्यमंत्री, पिंजर्‍यात राहातात, मातोश्रीच्या बाहेर निघत नाहीत. जनतेमध्ये जायला पाहिजे, प्रश्‍न बघायला पाहिजेत. मी मुख्यमंत्री असताना सगळ्यांनी पाहिले. 32 वर्षांत बकाल करून टाकली मुंबई. किती माणसे मुंबईत कोरोनामुळे गेले, कुणामुळे? औषधामध्ये देखील यांनी पैसे खाल्ले आहेत. शिवसेनेने अशी वेळ आणू नये की कसे पैसे खाल्ले हे मी लोकांसमोर उघड करीन. जनतेचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्‍न सोडवा आणि मग काय करायचे ते करा, अशी टीका यावेळी राणे यांनी केली.

COMMENTS