बालभारतीची आठ भाषांतील पाठ्यपुस्तके बाजारात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बालभारतीची आठ भाषांतील पाठ्यपुस्तके बाजारात

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्यभरातील निर्बंध शिथिल केले जात आहेत. राज्यातील शाळाही ऑनलाईन स्वरूपात सुरू झाल्या आहेत.

राहाता बस स्थानकातील प्रसाधनगृहातील पाणी रस्त्यावर
नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये एकाची आत्महत्या
काँग्रेस नेते राशीद अल्वींचं वादग्रस्त विधान | LOKNews24

पुणे : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्यभरातील निर्बंध शिथिल केले जात आहेत. राज्यातील शाळाही ऑनलाईन स्वरूपात सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळामार्फत (बालभारती ) राज्यातील पहिली ते बारावीच्या सर्व माध्यमांतील विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकेही विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. 

    पहिली ते आठवीची पाठ्यपुस्तके दहा भाषांच्या माध्यमात आणि नववी व दहावीची पाठ्यपुस्तके आठ भाषांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांसाठी मिळणार आहेत. बालभारतीचे संचालक दिनकर पाटील म्हणाले, ‘कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या हेतूने बालभारतीने वेळेवर सर्व पाठ्यपु्स्तके तयार केली आहेत. ही सर्व पाठ्यपुस्तके बालभारतीच्या विभागीय भांडारांत खुल्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तसेच पुस्तक विक्रेत्यांनी पहिली ते बारावीपर्यंतची सर्व भाषा माध्यमांची पाठ्यपुस्तके मंडळाच्या भांडारांतून खरेदी करून शाळा, दुकानांमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत’. शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनाही पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्यासाठी मंडळाच्या सर्व विभागीय भांडारांत किरकोळ विक्री सुरू ठेवण्यात आली असल्याची माहितीही पाटील यांनी दिली. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता सर्व वर्गांच्या सर्व माध्यमांची पाठ्यपुस्तके मंडळाच्या मुंबई (गोरेगाव), पनवेल, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर व कोल्हापूर या ९ विभागीय भांडांरामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

COMMENTS