बारामतीच्या ४४ गावांमध्ये शेती, पिण्यासाठी पाणी नाही… दिशाभूल करू नका…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारामतीच्या ४४ गावांमध्ये शेती, पिण्यासाठी पाणी नाही… दिशाभूल करू नका…

प्रतिनिधी : पुणेभाजप आमदार गोपीचंद पडळकर हे ठाकरे सरकारमधील नेत्यांवर टीकास्त्र सोडत आहे. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारां

81 व्या औंध संगीत महोत्सवास दिमाखात प्रारंभ
डिजिटल बँका आणि काही प्रश्‍न ?
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दीड लाख आणि दागिने घेऊन नवरी फरार

प्रतिनिधी : पुणे
भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे ठाकरे सरकारमधील नेत्यांवर टीकास्त्र सोडत आहे.

आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांवर निशाणा साधला . जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे झालेल्या सभेत गोपीचंद पडळकर बोलत होते.

आपण शरद पवार यांच्यावर वारंवार का निशाणा साधतो . या मागील कारण त्यांनी सभेत स्पष्ट केले .राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सतत आपल्या कामाच्या स्तुती करण्यात येते . आम्ही शेतकऱ्यांचे नेते आहोत .

मात्र ज्या बारामती विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवून ते निवडून आले आहेत . त्या मतदार संघातल्या 44 गावात शेतीला पाणी नाही, पिण्याला पाणी नाही, असे म्हणत पडळकरांनी राष्ट्रवादीला धारेवर धरले .

अशाच प्रकारची अवस्था जुन्नरमधील आहे . ज्या तालुक्यात 5 धरणे आहेत त्या तालुक्यातील जनतेला आज पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे . याच्यापेक्षा मोठं पाप या पवार कुटुंबियांचे कोणतच असू शकत नाही म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलतो, असे पडळकर म्हणाले .

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सर्वसामन्य जनतेची दिशाभूल करत आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या बरोबर तुम्ही या, असे आवाहन पडळकर यांनी केले आहे .

भाजप ही तरूणांसाठी काम करते, राष्ट्रहितासाठी काम करते. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून तो कोणत्याची नेत्याचा पक्ष नाही , असेही ते म्हणाले .

COMMENTS