बाबासाहेब कल्याणी यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाबासाहेब कल्याणी यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाने पुण्याचे नाव देशात, तसेच जगभर पोहोचविणार्‍या बाबासाहेब नीळकंठ कल्याणी यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

रथयात्रा, पदयात्रांचे पेव
दुसऱ्या फेरीचे मतदान आणि काॅंग्रेस मॅन्युफॅस्टो ! 
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना नाट्यपरिषदेचा जीवनगौरव

पुणे/प्रतिनिधीः उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाने पुण्याचे नाव देशात, तसेच जगभर पोहोचविणार्‍या बाबासाहेब नीळकंठ कल्याणी यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने कल्याणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर  हा पुरस्कार सोहळा होणार आहे. त्याचवेळी स्वातंत्र्यसैनिक आणि सीमेवर लढताना जखमी झालेल्या काही जवानांनाही गौरवण्यात येणार असल्याचे त्रिदल पुुणे पुण्ययभूषण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसई यांनी जाहीर केले. पुण्यभूषण पुरस्कारासाठी 2020 मध्येच ही निवड करण्यात आली होती; पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला नव्हता. पुरस्काराचे यंदाचे 32 वे वर्ष आहे. या पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपये रोख असे आहे. बाबा नीळकंठ कल्याणी हे एकूण तीन अब्ज डॉलर्सची उलाढाल असणार्‍या कल्याणी ग्रुप ऑफ कंपनीजमधील अग्रगण्य कंपनी असलेल्या भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.   यावेळी पुण्यभूषण पुरस्कार प्रदान समारंभ आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सीमेवर लढताना जखमी होऊन अपंग झालेल्या जवानांचा गौरव होणार आहे. त्यात धरमवीर सिंग, सुरेश कुमार कर्की, के. नागी रेड्डी, हौसाबाई पाटील (सातारा) आणि माधवराव माने (सांगली) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

COMMENTS