बाधिताच्या मृत्यूनंतर सिव्हील  हॉस्पिटलमध्ये नातेवाइकांकडून तोडफोड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाधिताच्या मृत्यूनंतर सिव्हील हॉस्पिटलमध्ये नातेवाइकांकडून तोडफोड

येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी तोडफोड केली. अतिदक्षता विभागाच्या काचा फोडण्यात आल्या.

त्या आरोपीला बालन्यायालयापुढेच हजर करा… कर्जतच्या प्रकरणात खंडपीठाने दिला तूर्तातूर्त अटकपूर्व जामीन
मायलेकाचा विहिरीत बुडून मृत्यू ; कर्जत तालुक्यातील हृदयद्रावक घटना
विकास पाहण्याची दृष्टी नसलेल्यांनी डोळ्यांच्या शिबीरात स्वत:चे डोळे तपासून घ्यावेत :- सुनील गंगुले

अहमदनगर/प्रतिनिधी: येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी तोडफोड केली. अतिदक्षता विभागाच्या काचा फोडण्यात आल्या. योग्य उपचार न झाल्याने रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून सर्वांना बाहेर काढले.

नगर तालुक्यातील वाकडी या गावातील एका कोरोनाबाधित रूग्णावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज सकाळी या रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने आणि ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण दगावला, असा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला. रुग्णाच्या नातेवाइकांनी यावरून खूप गोंधळ घातला. यातील एकाने अतिदक्षता विभागाच्या काचा फोडल्या. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. तोफखाना पोलीस जिल्हा रुग्णालयात पोहोचले. तोडफोडीचा पंचनामा केला. आतापर्यंत उपचार होत नसल्याबद्दल तक्रारी केल्या जात होत्या. ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले होते; मात्र आता थेट तोडफोडीची घटना घडल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, नगरमधील बधितांची संख्या कमी होत नाही. आज साडेतीन हजारांवर नवे रुग्ण आढळून आले आहेत. सुमारे 19 हजार रुग्णांवर उपचार सुरू असल्याने यंत्रणेवर मोठा ताण आला आहे.

COMMENTS