बस प्रवासातच संपली इहलोकीची यात्रा…एसटीतील बेशुद्ध प्रवाशाचा मृत्यू

Homeताज्या बातम्याअहमदनगर

बस प्रवासातच संपली इहलोकीची यात्रा…एसटीतील बेशुद्ध प्रवाशाचा मृत्यू

अहमदनगर/प्रतिनिधी- एसटी बसमध्ये बेशुद्धावस्थेत आढळलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना नगरच्या पुणे बसस्थानकावर घडली. बेशुद्धावस्थेतील या व्यक्तीला

कै. विष्णू उस्ताद आखाडा ठरतोय नागपंचमीची ओळख बदलवणारा आखाडा
केडगाव एमआयडीसीतील टाकीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली
चोरीच्या विविध गुन्ह्यांतील तीन आरोपींना पकडले

अहमदनगर/प्रतिनिधी- एसटी बसमध्ये बेशुद्धावस्थेत आढळलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना नगरच्या पुणे बसस्थानकावर घडली. बेशुद्धावस्थेतील या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. पण तेथे त्याच्यावर उपचार होण्यापूर्वी त्यांचे निधन झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रवाशाची ओळख पटलेली नव्हती.
कोल्हापूर ते औरंगाबाद जाणार्‍या एसटी बसने प्रवास करणारा तीस वर्षीय अनोळखी प्रवासी नगरच्या पुणे बसस्थानकावर बेशुद्धावस्थेत आढळल्याने त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलिस या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबतची माहिती अशी की कोल्हापूर ते औरंगाबाद जाणारी एसटी बसने (क्रमांक एमएच 14 बीपी 3389) प्रवास करणारा तीस वर्षाचा अनोळखी प्रवासी नगर येथील पुणे बस स्थानकावर एसटी बस आली असता बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्यास औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल केले होते, तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून तो मृत झाल्याचे घोषित केले. मृत व्यक्तीची उंची पाच फूट सहा इंच, रंग निमगोरा, शरीर बांधा पातळ, चेहरा उभट, ओठ काळसर, केस काळे बारीक, नाक सरळ, डोळे काळे, कपाळ अरुंद, ओठावर बारीक मिशी, पेहराव अंगात पांढर्‍या रंगाचा ठिपके असलेला फुल बाह्याचा शर्ट, डार्क राखाडी रंगाची फुल पॅन्ट घातलेली आहे. या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलिस ठाणे (फोन नंबर 0241-2416117) येथे संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

COMMENTS