बड्या हॉस्पिटलच्या लिफ्टच्या  लॉबीत रुग्णांवर उपचार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बड्या हॉस्पिटलच्या लिफ्टच्या लॉबीत रुग्णांवर उपचार

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि राज्यातील कोरोबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

रशिया-युक्रेनच्या युद्धाचा पुन्हा भडका
कोमलताई पाटोळे यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात ग्रामीण कलाकारांना संधी
 श्रीरामपूर मध्ये महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक

मुंबई/प्रतिनिधीः गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि राज्यातील कोरोबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येताना दिसत आहे. मुंबईतील काही रुग्णालयांमध्ये बेड्सही शिल्लक नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, उद्योजक हर्ष गोयंका यांनी हे भयाण वास्तव दाखवणारा मुंबईतील एका बड्या हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

गोयंका यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. रुग्णालयात बेड्स उपलब्ध नसल्याने रुग्णांना लिफ्टच्या लॉबीमध्ये बेड्स देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. आवश्यक औषधांचाही तुटवडा आहे. लसी उपलब्ध नाहीत. मुंबईतील परिस्थिती गंभीर आहे, असे त्यांनी व्हिडीओसह नमूद केले आहे. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, लिफ्टने ये-जा करण्यासाठी असलेल्या जागेतही बेड्स ठेवून रुग्णांवर उपचार केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दररोज 10 हजारांच्या जवळ रुग्णांची नोंद होत आहे. याशिवाय राज्यातील काही प्रमुख शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. मुंबत आतापर्यंतच्या आकडेवाडीनुसार 90 हजारांपेक्षा अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसंच रुग्ण बरे होण्याचा दरही आता 79 टक्क्यांवर आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 34 दिवसांवर आला आहे.

COMMENTS