फलटणमध्ये रेमडीसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फलटणमध्ये रेमडीसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

फलटण तालुक्यातकोरोना पॉझिटीव्ह रूग्णांना लागणारे रेमडीसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे रॅकेट फलटण शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.

खुनाच्या प्रयत्नाबद्दल एकास सक्तमजुरीची शिक्षा
बळीराजाची पहिली ऊस परिषद : ऊसाला प्रतिटन 4 हजार रूपये द्या अन्यथा ऊसतोड नाही
हुंड्यासाठी होणार्‍या छळामुळे जावयाने केली आत्महत्या…

रुग्णांच्या असाह्यतेचा फायदा घेणारी चौघांची टोळी पोलिसांच्या ताब्यात 

फलटण /प्रतिनिधी : फलटण तालुक्यातकोरोना पॉझिटीव्ह रूग्णांना लागणारे रेमडीसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे रॅकेट फलटण शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. रुग्णांची असाह्यता व बाजारपेठेतील इंजेक्शनचा तुटवडा याचा गैरफायदा घेणारी चार जणांची टोळी पकडण्यात पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे टोळीमध्ये फलटण येथील एका खासगी रुग्णालयातील वॉर्ड बॉयचा समावेश असल्याने या प्रकरणाचा गुंता फलटण तालुक्यासह खटाव तालुक्यात वाढणार आहे. 

याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांना खबर्‍याकडून सुनिल विजय कचरे हा सुविधा हॉस्पीटल जवळ स्वतःचे कोविड 19 च्या उपचारासाठी अतिशय गरजेचे असलेले रेमडिसिव्हीर इंजेक्शन छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्र करत आहे. लोकांच्या असह्यता व बाजार पेठेत रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा असलेला तुटवडा याचा गैरफायदा घेत 35 हजार रुपयाला हे इंजेक्शन विकत असल्यासची माहिती खबर्‍याने दिली होती. या माहितीच्या आधारे औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन सातारा अरूण सखाराम गोडसे यांना फलटण शहर पोलीस ठाणे यांना बोलावून घेवून त्यांना याची माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम यांनी बनावट गिर्‍हाईक म्हणून काम पाहणार्‍यांना रेमडिसिव्हर इंजेक्शनची वाढीव दराने विक्री करणार्‍या व्यक्तीला सुनिल विजय कचरे याच्या मोबाईलवरून फोन केला. त्यावेळी समोरून बोलणार्‍या व्यक्तीने रेमडिसिव्हीर इंजेक्शनची 1 बाटली असल्याचे सांगून प्रत्येक बाटलीस 35 हजार रूपये या प्रमाणे विक्री करत असल्याचे सांगितले. त्यावेळी बनावट गिर्‍हाईक बनलेल्या पोलीस उपनिरिक्षकांनी 1 इंजेक्शन खरेदी करण्यास होकार दिला. त्यावेळी फोनवर बोलणार्‍या समोरील इममाने मगर हॉस्पीटलचे पाठीमागे लक्ष्मीनगर फलटण येथे लवकरात लवकर येण्यास सांगितले.

त्याप्रमाणे उपस्थित पंच हुद्दा औषध निरीक्षक अरूण सखाराम गोडसे, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सपोनि एस. के. राऊळ, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम पोलीस, सहायक फौजदार एस. एन. भोईटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल व्ही. पी. ठाकूर, पोलीस नाईक एस. डी. सुळ, एन. डी. चतुरे, व्ही. के. लावंड, पोलीस शिपाई ए. एस. जगताप हे या ठिकाणी रवाना होवून सापळा लावून थांबले. तसेच बोगस गिर्‍हाईक अमोल कदम पोलीस उपनिरीक्षक फलटण यांनी त्यांचे मोबाईल वरून विक्री करणारे इसमांचे मोबाईलवर कॉल केला. त्यावेळी त्याने पुढे काही अंतरावर मी एका मोटार सायकलवर बसलो आहे, असे सांगितले. त्या प्रमाणे कदम हे त्यांच्या खाजगी गाडीवर जावून मोटार सायकल जवळ जावून रेमडिसिव्हीर इंजेक्शन संदर्भात चर्चा केली. एका व्हायलसाठी किती रुपये द्यावे लागतील असे विचारले असता त्याने 35 हजार रूपये लागतील असे सांगितले. 

रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारा टप्प्यात आल्याबरोबर उपनिरिक्षक कदम यांनी इतर सहकार्‍यांना इशारा दिला. तात्काळ पोलीस पथक व पंच, औषध निरीक्षकांनी छापा टाकून इंजेक्शनचा काळा बाजार करणारा पळू जाण्याच्या तयारीत होता. त्याला जागीच गराडा घालून पकडून ताब्यात घेतले. या कारवाईत फलटण शहरातील सुविधा हॉस्पिटलचा वार्ड बॉय सुनिल विजय कचरे (वय 38, रा. नेर पुसेगांव, ता. खटाव, जि. सातारा), अजय सुरेश फडतरे (वय 34, रा. पिंप्रद, ता. फलटण, जि. सातारा), प्रविण मिस्त्री ऊर्फ प्रविण दिलीप सापते (रा. घाडगेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) व निखिल अनिल घाडगे (रा. अनपटवाडी) या चौघांना पोलिसांनी जेरबंद केले. 

ही कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बंन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सपोनि एस. के. राऊळ, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, सहायक फौजदार एस. एन. भोईटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल व्ही. पी. ठाकूर, पोलीस नाईक एस. डी. सुळ पोलीस नाईक एन. डी. चतुरे, पोलीस नाईक, व्ही. एच. लावंड, पोलीस शिपाई ए. एस. जगताप यांनी केली आहे.

COMMENTS