दिल्ली : प्रतिनिधी मुंबई क्रूझ ड्रग्ज केस प्रकरणावरून एकीकडे मंत्री नवाब मलिक एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करताना पाहायला
दिल्ली : प्रतिनिधी
मुंबई क्रूझ ड्रग्ज केस प्रकरणावरून एकीकडे मंत्री नवाब मलिक एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करताना पाहायला मिळतआहे.
तर दुसरीकडे प्रकरणातील साक्षीदार किंवा पंच असलेले प्रभाकर साईल यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर यांच्यासह पंच के पी गोसावी यांच्याबाबत केलेल्या २५ कोटींच्या डील प्रकरणावरुन एकच खळबळ उडाली आहे.
यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे काही आरोप लागले आहेत त्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे आणि ती योग्य प्रकारे होईल.
जर एनसीबीला तसं वाटलं ही चौकशी होईपर्यंत त्यांना बाजूला ठेवलं पाहिजे तर ते तसा निर्णय घेतील. आज त्यांना तसं वाटलं नसेल, असे फडणवीस म्हणाले.
तसेच शेवटी ही स्ट्रॅटजीही असू शकते की एखाद्या अधिकाऱ्यावर सतत आरोप करायचे जेणेकरुन त्या अधिकाऱ्याला चौकशीपासून बाजूला करता येईल.
मात्र अशी पद्धत पाडणं योग्य नाही. आणि म्हणून प्रायमाफेसी केस असेल तर ते निर्णय घेतील. शेवटी यासंदर्भातील निर्णय करायला मी अधिकारी नाही आणि मला त्यात बोलण्याचा अधिकारही नाही.
एनसीबीचं जे काही इंटरनल फँडिंग आहे त्या आधारावर ते निर्णय घेतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
कुठल्याही इन्व्हेस्टिगेटिंग अधिकाऱ्याला वैयक्तिक लक्ष्य करणे योग्य नाही. तुमच्याजवळ काही पुरावे असतील तर तुम्ही कोर्टाला दिले पाहिजे कारण ऑनगोईंग केस आहे.
ऑनगोईंग केसमध्ये संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती बाहेर बोलतो पण कोर्टात मात्र पुरावे देत नाही, हे अतिशय चुकीचे आहेत.
जे काही चाललेलं आहे त्यामध्ये प्रोसिक्युशनचे जे विटनेस आहेत त्यांची क्रेडिबिलिटी खराब करायचं काम जर सरकारी तंत्राने व्हायला लागलं तर यापुढे कुठलीच केस कुठेच टिकणार नाही.
आणि एक नविन चुकीची पद्धत या ठिकाणी तयार होईल. दुसरीकडे वानखेडेंच्या पत्नीने सगळे पुरावे दिले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांवर उत्तर दिले.
COMMENTS