HomeUncategorized

प्राक्तन पांडव प्रथम, ओंकार गुरव द्वतीय, कविता व स्वाती लोनबळे तृतीयराज्यस्तरीय ओबीसी सत्यशोधक परीक्षेचा निकाल जाहीर

महात्मा फुले बँक, सावित्री शक्ती पीठ व फुले आंबेडकर तत्वज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन सत्यशोधक परीक्षेचा निकाल जाहिर झाला अ

विद्यार्थी हे देशाचे भविष्य असतात याशनी नागराजन; शाळा प्रवेश दिन उत्साहात
कायचिकित्सा विषयात एलआरपी आयुर्वेद मेडिकल कॉलेजचा मंगेश तपकीर राज्यात प्रथम
जिल्हा कोषागार अधिकारी धनाजी शिंदे यांना मुंबईत उपसंचालक पदी पदोन्नती

महात्मा फुले बँक, सावित्री शक्ती पीठ व फुले आंबेडकर तत्वज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन सत्यशोधक परीक्षेचा निकाल जाहिर झाला असून औरंगाबाद येथील प्राक्तन पांडव यांनी राज्यात पहिल्या क्रमांकाचे 10 हजार रूपयांचे रोख पारितोषिक मिळविलेले आहे. सात हजार रूपयांचे दुसर्‍या क्रमांकाचे बक्षिस सातार्‍याचे ओंकार गुरव यांनी पटकाविले असून तिसर्‍या क्रमांकाचे 5 हजार रूपयांचे बक्षीस कवीता कनवडकर(सांगली) व स्वाती लोनबळे (चंद्रपूर) या दोघींनी संयुक्तपणे मिळविलेले आहे. अमरावतीच्या महात्मा फुले बँकचे चेअरमन राजेंद्र आंडे, सावित्री शक्ती पीठाच्या संयोजिका सुवर्णा कोरे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. लवकरच पुरस्कार व प्रमाणपत्र वितरण सोहळा नाशिक येथे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती संयोजक दशरथ कूलधरण यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.    परीक्षेबद्दल अधिक माहिती देतांना पत्रकात पुढे म्हटले आहे की, फुले आंबेडकर तत्वज्ञान विद्यापीठातर्फे गेल्या 27 वर्षांपासून समतावादी अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके छापली जातात व त्यावर 100 गुणांची लेखी परीक्षा राज्यभर आयोजित केली जाते. गेल्या दोन वर्षांपासून करानोच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा ऑनलाइन घ्यावा लागत आहेत. आतापर्यंत तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुलेंच्या गुलामगिरी, शेतकर्‍याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, सत्यशोधक विधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरलिखीत ऍनिहिलेशन ऑफ कास्ट, रिडल्स इन हिंदूझम, स्टेट्स अँड मॉयनॉरिटिज, काऊंटर रिव्होल्युशन, भारताचे संविधान आदि ग्रंथांवर वारंवार परिक्षा आयोजित केल्या आहेत. राज्यात सर्वदूर 300 परीक्षा केंद्रे आहेत.    यावर्षीची ऑनलाईन परीक्षा फक्त ओबीसी-भटके जातीतील तरूण व तरूणींसाठी मर्यादित होती. मात्र एस्सी, एस्टी, बौद्ध व ओपन कॅटेगिरितील अनेक उमेदवारांनी परीक्षा देण्याची ईच्छा व्यक्त केल्यामुळे त्यांना काही अटींवर परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली. नॉन-ओबीसी मेरीट लिस्टमध्ये परभणीचे निवृत्ती उद्धव घाटूल यांनी सर्वाधिक 90 टक्के गुण मिळवून राज्यात सर्वोच्च स्थान पटकाविले आहे. दुसर्‍या स्थानावर बुलढाण्याचे सुधीर अंभोरे व सत्यवान आत्राम (चंद्रपूर) तिसर्‍या स्थानावर आहेत. या परीक्षार्थींचे अभिनंदन कुलदीप रामटेके व गजानन शिरसाठ यांनी केले आहे. एकूण 500 परिक्षार्थींपैकी 400 ओबीसी होते व त्यातही मुलींची संख्या 238 होती. या ऑनलाईन परीक्षेसाठी फुलेआंबेडकरांचे चार ग्रंथ पाठ्यपुस्तक म्हणून देण्यात आले होते. करोनामुळे या पुस्तकांच्या छापील प्रती देता आल्या नाहीत, म्हणून पुस्तकाच्या पीडीएफ कॉपीज परीक्षार्थींना अभ्यासासाठी देण्यात आल्या होत्या. परीक्षेसाठी कोणतीही प्रवेश फी नव्हती. परीक्षार्थींना फुलेआंबेडकरांची ही पुस्तके सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी मान्यवर अभ्यासू वक्त्यांची व्याख्याने ऑनलाइन ठेवण्यात आली होती. पुढील ऑनलाईन परीक्षा जानेवारी 2022 मध्ये आयोजित करण्यात आली असून अभ्यासासाठी ‘‘स्वामी पेरियार यांचे जीवनचरित्र व विचार-कार्य’’ या पाठ्यपुस्तकावर आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहितीही या पत्रकात देण्यात आली आहे.

COMMENTS