प्रवीण दरेकरांनी सांगितलं… मुख्यमंत्री का म्हणाले भावी सहकारी…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रवीण दरेकरांनी सांगितलं… मुख्यमंत्री का म्हणाले भावी सहकारी…

प्रतिनिधी : मुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात भाषण करण्यासाठी आले. यावेळी कार्यक्रमादरम्यान भाजपा नेत्यांचा उल्लेख ‘भावी सह

शिवतारे भाजपच्या कमळ चिन्हावरही लढण्यास तयार
बड्या हॉस्पिटलच्या लिफ्टच्या लॉबीत रुग्णांवर उपचार
29 ऑक्टोबर रोजी वधू-वर मेळाव्यास नाव नोंदणी करून उपस्थित रहा-तानाजी बाप्पू जंजिरे

प्रतिनिधी : मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात भाषण करण्यासाठी आले. यावेळी कार्यक्रमादरम्यान भाजपा नेत्यांचा उल्लेख ‘भावी सहकारी’ असा केल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे.

त्यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने अर्थ लावत आहे. मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या विधानाचे दोन अर्थ काढले आहेत.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यावेळी प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारण्यात आली.

तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाबाबत दोन मते व्यक्त केली. पहिले म्हणजे, “काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून दबावाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे त्यांना शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले असावे.

कदाचित त्यांच्या मते दबावाचे राजकारण केले तर आमच्यासाठी भाजपचे दरवाजे उघडे आहेत, असे त्यांना वाटते.” आणि दुसरे म्हणजे, “कदाचित चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या कालच्या विधानाला मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर द्यायचे असेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले असावे.” अशी ती मते आहेत.

COMMENTS